आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comedy Nights With Kapil: Virat Laughs At Anushka

OMG! 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर विराटसमोर आली अनुष्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर कपिल शर्मा आणि विराट कोहली)
मुंबई - 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या आगामी एपिसोडमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली हास्याचे कारंजे उडवताना दिसणार आहे. सुनील गावस्कर, कपिल देव, युसुफ पठाण, इरफान पठाण, विरेंद्र सहभाग यांच्यानंतर आता विराट कोहली या शोमध्ये झळकणार आहे. या शोमध्ये विराटने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला. इतकेच नाही तर कपिलच्या विनोदावर तो हसून-हसून लोटपोटसुद्धा झाला.
शोमध्ये कपिलची फॅमिली विराटसह धमाल-मस्ती करताना दिसणारच आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शोमध्ये अचानक विराटसमोर अनुष्का येणार आहे. चकित झालात ना... विराट आणि अनुष्का एकमेकांसमोर सार्वजनिक मंचावर कसे आले, याचाच विचार करतायत ना. चला तर मग आम्ही तुमची उत्सुकता जास्त ताणून धरत नाही.
शोदरम्यान अनुष्का शर्मा नव्हे तर अनुष्का नावाची दुसरी तरुणी प्रेक्षकांमध्ये हजर होती. जेव्हा विराटसह प्रेक्षक गप्पा मारत होता, तेव्हा प्रेक्षकांमधून एक तरुणी उभी झाली आणि तिने आपले नाव अनुष्का असल्याचे सांगितले. त्यानंतर कपिने पंच मारत 'माय सेल्फ शर्मा....!' असे म्हटले. कपिलचे हे म्हणणे ऐकून विराट हसून हसून लोटपोट झाला. कपिलच्या अशाप्रकारच्या पंचलाइनमुळेच हा शो प्रेक्षकांची पसंती मिळवतोय.
कपिल आणि त्याची ऑनस्क्रीन पत्नी सुमोनाचे सादरीकरणसुद्धा विराटने एन्जॉय केले. शोमध्ये विराटने कपिलच्या स्कूटरवरुन एन्ट्री घेतली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर क्लिक झालेली विराटची खास छायाचित्रे...