(दादीच्या पात्रात अली आणि किस करताना राजपाल यादव)
नवी दिल्ली- बुधवारी (10 डिसेंबर) संध्याकाळी दिल्लीच्या फिक्की सभागृहात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समितीच्या वतीने एक समारंभात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड कलाकारांनी धमाल-मस्ती केली. या कार्यक्रमात बॉलिवूडचे प्रसिध्द खलनायक प्रेम चोप्रा, रंजीतसुध्दा उपस्थित होते. सोबतच रंधीर कपूर, राजपाल यादवसुध्दा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. समारंभादरम्यान सर्वात जास्त मनोरंजन केले ते म्हणजे 'कॉमेडी नाइट्स'च्या दादीने. दादी बनलेल्या अली असगरने स्टेजवर खूप मजा केली. दादीने स्टेजवर उपस्थित सर्व कलाकारांना किस केले. राजपाल यादवसुध्दा मस्तीच्या मूडमध्ये दिसला. त्यानेसुध्दा दादीला रिटर्न गिफ्ट म्हणून एक किस दिली.
सर्व कलाकारांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली. यानिमित्त सर्व लोकांनी शपथ घेतली होती, की मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक देशवासी
आपली जबाबदारी पार पाडतील. कार्यक्रमादरम्यान ज्या लोकांचे या क्षेत्रात योगदान आहे अशा देश-परदेशातील लोकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थिती लावण्यासाठी पोहोचलेल्या कलाकारांचासुध्दा सन्मान करण्यात आला. यावेळी कॉमेडी नाइट्सच्या दादीने आपल्या अंदाजात सर्वांशी बातचीत केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटची आणि दादीच्या धमाल-मस्तीची छायाचित्रे...