मुंबईः ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील नैतिक अर्थातच अभिनेता करण मेहराची पत्नी निशा रावलकडे गोड बातमी असून ती लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. ही गोड बातमी स्वतः निशाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. निशाने बेबी बंप दाखवतानाचा एक फोटो शेअर करुन लिहिले, "माझ्या वाढत्या वजनावरुन लावण्यात येणा-या तर्कवितर्कांना पूर्णविराम लावा. होय, आमचे पहिले बाळ लवकरच येणारेय आणि आम्ही या प्लॅनेटवर नवीन सुरुवात करत आहोत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे."
करणने दिली कबुली
करण मेहरानेसुद्धा त्याची पत्नी निशा प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन लिहिले, "देवाच्या कृपेने आम्हाला आयुष्यात अनेक गोष्टी मिळाल्या. आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. एका सुंदर स्टोरीची सुरुवात होतेय....निशाची प्रेग्नेंसी"
डिसेंबरमध्ये नाकारली होती बातमी
डिसेंबर 2016 च्या शेवटच्या आठवड्यात निशा गर्भवती असल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र त्यावेळी करणने ही बातमी नाकारली होती. करणने एका लीडिंग वेबसाइटसोबत बोलताना म्हटले होते, की “जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मी याविषयी कमेंट करेल, तोवर तुम्हाला जे हवे ते लिहाल.”
तर, dainikbhaskar.comसोबत बोलताना निशा रावलने तिच्या प्रेग्नेंसीची बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. ती म्हणाली होती, “गेल्या वर्षभरापासून लोक बरेच काही बोलत आहेत. अनेक ठिकाणी तर आमचा एक मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. तर कुठे माझ्या प्रेग्नेंसीविषयी चर्चा होतोय. मला वाटतं, या सर्व अफवांवर पूर्णविराम लागायला हवा. माझे आणि करणचे अद्याप एकही मुल नाहीये. जेव्हा ही गोड बातमी येईल, तेव्हा आम्ही स्वतः ती तुमच्यासोबत शेअर करु.”
पुढील स्लाईड्समध्ये बघा निशा आणि करणचे काही फोटोज...