आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बॉसमध्ये सपना चौधरीच्या कॅरेक्टरवर लावले प्रश्न चिन्ह, शोमध्ये बोलले गेले याबद्दल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका डान्स शोमध्ये सपना चौधरी. - Divya Marathi
एका डान्स शोमध्ये सपना चौधरी.

मुंबई - 'बिग बॉस-11'मध्ये सपना चौधरी इमोशनल अवतारात पाहायला मिळाली. झाले असे, की सपनाच्या मागे पुनीष शर्मा आणि बंदगी कालरा काय-काय बोलतात हे अर्शी खान तिला सांगते. हे ऐकल्यानंतर सपनाला सुरुवातीला तर खूप राग येतो मात्र नंतर ती रडायला लागते. त्याचवेळी तिचा मित्र प्रियंक शर्मा तिथे येतो आणि तो सपनाला सांभाळतो. 

 

अर्शी म्हणाली- पुनीषने उपस्थित केले सपनाच्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह 
- अर्शी खान शोमध्ये सपनाला सांगते, की पुनीष तुझ्याबद्दल म्हणतो की तिचे शोज क्लासी नाही सरत मासी असतात. तिथे कशा-कशा प्रकारचे लोक असतात. 
- 'तिचे शो पाहायला येणाऱ्याचा काही क्लास नसतो. त्यांचे काही स्टँडर्ड नसते. काही लोक तर कट्टा (रिव्हॉल्व्हर) घेऊन आलेले असतात आणि सरळ उचलून घेऊन जातात. त्यामुळे सपनाला सिक्यूरिटी ठेवावी लागते.'
- अर्शी एवढेच सांगून थांबत नाही, तर पुढे सांगते, की बंदगी म्हणत होती की सपना जेव्हा बोलण्यासाठी तोंड उघडते तेव्हा फक्त घाणच बाहेर पडते. 
- अर्शीच्या तोंडून हे एकल्यानंतर सपना म्हणते, 'शो मध्ये राहाण्यासाठी मी बंदगी-पुनीष सारखी लव्हस्टोरी तर क्रिएट करत नाही. खोटे नाटक करत नाही.'
- 'माझा चेहरा कसाही असला तरी माझे मन आणि विचार तरी चांगले आहे. मी यांच्यासारखी कधीही बनू शकत नाही.' 

 

पुनीष सपनाला म्हणाला होता 'अनपढ'
- कोर्ट रुम ड्रामच्या लक्झरी टास्कमध्ये पुनीष-बंदगी आणि सपना यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. 
- तेव्हा टास्कमध्ये सपनाच्या तोंडाळ असण्यावरुन पुनीष म्हणाला होता, 'सपना अडानी असून एकदम अनएज्यूकेटेड लोकांसारखे बोलते.'
- तेव्हा सपनाने त्याला उत्तर दिले होते, की 'होय. मी 12 नापासा आहे, मात्र मी माझ्या जीवावर माझ्या कुटुंबाला सांभाळते. याच्यासारखी बापाच्या पैशांवर ऐश तर करत नाही.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सपनाच्या कॅरेक्टरवर प्रश्न चिन्ह लावल्यानंतर काय झाले घरात... 

बातम्या आणखी आहेत...