आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contestants Enjoying On Sets Of Khatron Ke Khiladi 5

'खतरों के खिलाड़ी' : PICSमध्ये पाहा स्पर्धक सेलिब्रिटींची ऑफस्क्रिन मस्ती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्तथरारक स्टंट्सवर आधारित 'फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी 5' या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांना तुम्ही अॅडव्हेंचर करताना पाहिले आहे. मात्र ऑफस्क्रिन हे सेलिब्रिटी स्पर्धक भरपूर धमाल-मस्ती करतात.
टीव्हीवर एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करताना दिसणारे हे सेलिब्रिटी ऑफस्क्रिन मात्र एकमेकांसोबत चांगले बॉडिंग शेअर करतात. कधी हे खूप धमाल-मस्ती करतात. तर कधी आपले निवांत क्षण अविस्मरणीय करताना दिसतात.
'खतरों के खिलाडी'चे पाचवे पर्व दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत आहे. या शोमध्ये करणवीर बोहरा, टीजे सिद्दू, गौहर खान, निकितन धीर, रजनीश दुग्गल, गुरमीत चौधरी, देबिना, सलमान यूसुफ खान, दयानंद शेट्टी आणि गीता टंडन स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. आत्तापर्यंत या शोमधून पूजा गौर, रोशेल मारिया राव आणि मुग्धा गोडसे एलिमिनेट झाले आहेत. तर खांद्याच्या दुखापतीमुळे कुशाल टंडन शोमधून बाहेर पडला.
divyamarathi.com आपल्या वाचकांना 'खतरों के खिलाडी' या शोमधील सेलिब्रिटी स्पर्धकांची ऑफ स्क्रिन धमाल-मस्ती छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
वरील छायाचित्रात टीजे सिद्धू आणि गौहर खान केपटाउनमध्ये फॅशनेबल अंदाजात दिसत आहेत.