आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खतरों के खिलाडी 6' : स्पर्धकांनी केले फोटोशूट, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिद्धी डोगरा आणि सना खान)
मुंबईः थरारक स्टंट्सवर आधारित 'खतरों के खिलाडी : जर का ब्लॉकबस्टर' या शोचे नवे पर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. पाचव्या पर्वाप्रमाणेच या शोचे सहावे पर्वसुद्धा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे. या नवीन पर्वात सागरिका घाटगे, रश्मी देसाई, आशीष चौधरी, इकबाल खान, रिद्धी डोगरा,हुसैन कुवाजेरवाला, आशा नेगी, राकेश कुमार, अर्चना विजय, मयांग चांग, सिद्धार्थ भारद्वाज आणि सना खान सहभागी होणारे स्पर्धक आहेत.
divyamarathi.comशी बातचित करताना सना खानने सांगितले, "या शोसाठी मी खूप उत्साहित आहे. 15 प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत मी केपटाऊनला जातेय. तेथे खतरों के खिलाडीच्या सहाव्या पर्वाचे शूटिंग होणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा मी आपल्या आयुष्यात रिस्क घेत आहे. स्टंट खूप थरारक आणि भयावर असतात. मात्र मी या पर्वातील स्ट्राँगेस्ट कंटेस्टंट ठरेल, अशी मला आशा आहे."
पवित्र रिश्ता फेम आशा नेगीसुद्धा या पर्वात सहभागी होणार आहे. आशा म्हणाली, "मला स्टंट पसंत आहेत. ही माझ्यासाठी एक रोमहर्षक ट्रीप ठरेल. त्यासाठी मी खूप उत्साहित आहे."
या सर्व सेलिब्रिटी स्पर्धकांनी अलीकडेच 'खतरों के खिलाडी 6' साठी एक खास फोटोशूट केले आहे. त्यांच्या फोटोशूटची खास झलक तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...