आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversial Tweet Of Puneet Issar Daughter About Karishma Tanna

Bigg Boss: करिश्मावर भडकली पुनीत इस्सरची मुलगी, केले वादग्रस्त वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, सिद्धांत, निवृत्ती, पुनीत आणि दीपाली इस्सर)
मुंबईः 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक आणि अभिनेता पुनीत इस्सरची मुलगी निवृत्ती एका वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आली आहे. निवृत्तीने हे वादग्रस्त ट्विट बिग बॉसची स्पर्धक करिश्मा तन्नाच्या वडिलांवर केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, की "तिच्या वडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे, की करिश्मासारखी मुलगी असल्याने त्यांनी स्वतः आपली जीवनयात्रा संपवली." निवृत्तीचे हे ट्विट करिश्माच्या चाहत्यांनी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर करणे सुरु केले आहे.
निवृत्तीला लवकरच आपली चुक उमगली आणि तिने आपल्या ट्विटर अकाउंटची सेटिंग बदलून ट्विट्स प्रोटेक्टेड केले. इतकेच नाही तर निवृत्तीने ट्विटरवरील आपल्या नावातसुद्धा बदल केला आहे. पूर्वी ट्विटरवर निवृत्तीचे नाव निवृती पी इस्सर असे दिसायचे. आता तिने ते बदलून निवृती इस्सर असे केले.
'बिग बॉस 8' सुरुवातीच्या एपिसोडमध्ये करिश्मा पुनीत इस्सरला बघून भावूक झाली होती. कारण तिला तिच्या वडिलांची आठवण झाली होती. पुनीतसुद्धा करिश्माला आपली मुलगी संबोधतात. 2012 मध्ये करिश्माच्या वडिलांचे निधन झाले होते.
पुनीतची मोठी मुलगी आहे निवृती...
पुनीत इस्सरला दोन मुले आहेत. मुलगा सिध्दांत आणि मुलगी निवृती. निवृती पुनीतची मोठी मुलगी आहे. पुनीतची पत्नी आणि निवृतीची आई दीपाली इस्सर 60, 70 आणि 80च्या दशकातील प्रसिध्द बालकलाकार आहे. 'मेरे लाल' (1966), 'वापस' (1969), 'खिलौना' (1970) आणि 'संसार' (1971)सारख्या सिनेमांत तिने काम केले आहे. दीपाली सत्यजीत पुरीची बहीण आहे.

स्वत:ची कंपनी चालवते...
निवृतीच्या सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक प्रोफाइलनुसार, ती साइकेडेलिक नोमाज (Psychedelic Nomadz) नावाच्या एका कंपनीची फाऊंडर आहे. ती आर्ट, आर्किटेक्चर, फॅशन, रिटेलसारख्या क्षेत्रात डिझाइन रिव्ह्यू आणि डेव्हलपमेन्टचे काम करते.

विवाहित आहे निवृती...
निवृती इस्सरचे लग्न झाले आहे. तिच्या पतीचे नाव गौरव खिआर आहे. गौरव EXFAQ Systems pvt ltd. नावाच्या कम्प्यूटर आणि टेक्नॉलॉजी कंपनीत कार्यरत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा निवृत्ती इस्सरची निवडक छायाचित्रे...