मुंबई- आधी अमली पदार्थ सेवन मग पत्नीशी गैरवर्तणूक नंतर टीव्हीवरच्या रिअॅलिटी शोमध्ये आक्षेपार्ह वर्तन करणे असल्या प्रकारांमुळे कायम चर्चेत राहिलेला राहुल महाजन आता पुन्हा वादाच्या भोव-यात सापडला आहे. राहुल महाजनची अलीकडेच
बिग बॉसच्या घरात चॅलेंजरच्या रुपात एन्ट्री झाली आहे. जेव्हापासून राहुल घरात आला आहे, तेव्हापासून करिश्मा तन्नामुळे तो चर्चेत आहे. गेल्या सहा वर्षांपासून राहुल तिच्या मागे पडला असल्याचे काही दिवसांपूर्वीच शोमध्ये उघड झाले. एका टास्कदरम्यान करिश्माने त्याच्यावरचा
आपला रागसुद्धा व्यक्त करुन त्याला खडे बोल सुनावले.
सोमवारी पुन्हा एकदा राहुल आणि करिश्माविषयीचा एक आश्चर्यजनक खुलासा झाला. एकेकाळी म्हणे राहुल आणि करिश्मा रिलेशनशिपमध्ये होते. त्याकाळात राहुलने तिच्यावर बरेच पैसे उधळले असल्याचे त्याने उपेनला सांगितले. ही गोष्ट उपेनकडून करिश्माला समजली. त्यावरुन ती चांगलीच वैतागली आहे.
आता या गोष्टीत किती तथ्य आहे, हे तर करिश्मा आणि राहुललाच ठाऊक. मात्र राहुल वादात अडकण्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही तो अनेकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे.
कोणकोणत्या कारणांमुळे राहुल महाजन वादाच्या भोव-यात अडकला, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत..
डिंपीने लावता होता कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप
भाजपते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा असलेला राहुल महाजन याने पहिल्या पत्नीप्रमाणेच दुस-या पत्नीला देखील मारहाण केली होती. त्याच्या जाचाला कंटाळून डिंपी गांगुलीने राहुलचे घरदेखील सोडले होते. कलर्स चॅनलवरच्या 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या स्वयंवरातून राहुलने व्यवसायाने मॉडेल असलेल्या कोलकात्याच्या डिंपीची पत्नी म्हणून निवड केली होती. काकाच्या (प्रविण महाजन) निधनाचे वृत्त कळले तरी राहुलने ठरल्याप्रमाणेच थाटात लग्न केले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट देणारा राहुल आता सुधारेल अशी आशा त्यावेळी वाटत होती. मात्र घडले भलतेच.
लग्नानंतर सुरुवातीचे दिवस आनंदात गेले आणि डिंपीने अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. इथेच राहुल आणि डिंपी यांच्यात ठिणगी पडली. नंतर किरकोळ कारणांवरुनही जोरदार वाद होऊ लागले. एकेदिवशी पहाटे तीनच्या सुमारास डिंपीच्या
मोबाइलमधील मेसेज बघण्याची इच्छा झाली म्हणून राहुलने तिचा मोबाइल ताब्यात घेतला. मात्र कि पॅड लॉक कसे ओपन करायचे हे त्याला समजत नव्हते आणि आता झोपू दे मग सांगते असे डिंपी म्हणाली म्हणून राहुल चिडला. क्षुल्लक कारणावरुन राहुलने डिंपीला जबर मारहाण केली होती. या मारहाणीने डिंपीच्या हातापायांना दुखापत झाली होती. तसेच डोक्याला टेंगूळही आले होते. अखेर जाचाला कंटाळून तिने राहुलचे घर सोडले होते. मात्र काही दिवसांतच राहुलने तिची समजूत घालून तिला घरी परत आणले होते.
राहुलशी निगडीत वादांविषयी अधिक जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...