मुंबई - आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा आपल्या आगामी 'हायवे' या सिनेमाविषयी खूप उत्सुक आहेत. येत्या 21 फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्याने आलिया आणि रणदीप आपल्या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन करत आहेत. यानिमित्ताने हे दोघे अलीकडेच कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोच्या सेटवर हजेरी लावली होती. शोमध्ये प्रमोशनसोबतच या दोघांनी दादी आणि कपिलसोबत भरपूर धमाल-मस्ती केली.
कपिल शर्माने आपल्या
ट्विटर आणि फेसबूक अकाउंटवर ट्विट केले, ''आजचे शुटिंग 'हायवे'ची टीम आलिया भट्ट, रणदीप हुड्डा आणि इम्तियाज अलीसोबत झाले. त्यानंतर इंडियाज गॉट टॅलेंटचा स्पेशल एपिसोडसुद्धा या टीमसोबत शूट कणरण्यात आला.''
'हायवे'मध्ये मेन लीडमध्ये असलेल्या रणदीप हुड्डाला दादीने शगुनची पप्पी दिली. तर आलियासोबतदेखील दादी थिरकताना दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मधील आलिया आणि रणदीपची धमाल...