आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटानंतर या TV अॅक्ट्रेसने कमी केले 25 किलो वजन, खासगी आयुष्याविषयी तोडले मौन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौर आणि अभिनेता शालीन भनोट यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे. दिलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्याचा आरोप केला होता. तर शालीनने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे वेगळे राहात होते. अलीकडेच दिलजीतने तिच्या खासगी आयुष्याविषयीचे मौन तोडले आणि तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, ते सांगितले. 

दिलजीतने सांगितले, की तिला दोन वर्षे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण या काळाने तिला स्ट्राँग आणि कॉन्फिडेंट बनवले. ती सांगते, "आयुष्यातील हा काळ मुळीच चांगला नव्हता. पण आता मी आनंदी आणि स्ट्राँग झाले आहे. माझा मुलगासुद्धा आनंदी आणि हेल्दी आहे. जेव्हा तो एकदा हसतो, तेव्हा मी दहा वेळा हसते."

कमी केले 25 किलो वजन
दिलजीतने घटस्फोटानंतर स्वतःचा मेकओवर केला आहे. तिने 25 किलो वजन कमी केले आहे. आता ती अगदी फिट दिसते. दिलजीत सांगते, "ही माझ्या आयुष्यातील एक मोठी लढाई होती. मी माझे बरेच वजन कमी केले. आता जेव्हा मी आरशासमोर उभी होते, तेव्हा स्वतःला बघून विश्वास बसत नाही. मी स्वतःला मेंटेन केले आहे."
 
पुढील स्लाईड्सवर बघा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...