आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TVच्या दोन भाभी: एकीच्या शोचे पूर्ण झाले 1900 एपिसोड, दुसरी अडकली वादात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा वाकाणी आणि शिल्पा शिंदे - Divya Marathi
दिशा वाकाणी आणि शिल्पा शिंदे
मुंबई: अलीकडेच टीव्ही अभिनेत्री दिशा वाकाणीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या लोकप्रिय कॉमेडी मालिकेने 1900 एपिसोड पूर्ण केले. तसेच शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है' मालिकेच्या वादांमुळे चर्चेत आली आहे. छोट्या पडद्यावरील या दोन्ही भाभी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. चला एक नजर टाकूया दोघींच्या आयुष्यावर...
दिशा वाकाणी
पती: मयूर परिहार
अॅक्टिव्ह: 2002पासून

दिशा वाकाणीने आपल्या बोलीतून आणि अभिनयातील अंदाजाने टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. प्रेक्षक तिला तिच्या ख-या नावापेक्षा जास्त 'दया बेन' नावाने जास्त ओळखतात. तिने 10पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स पटकावले. दिशा पडद्यावर हसतमुख, बोलकी आणि कूल दिसते. तेवढील रिअल लाइफमध्ये ती शांत आणि कामाशी काम ठेवणारी आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की ती अनोळखी लोकांशी बोलणे टाळते. तिला जास्त बोलायलासुध्दा आवडत नाही. अनोळखी लोकांपासून ती दूर राहते. परंतु शोमध्ये ती याउलट आहे.
शिल्पा शिंदे
मॅरिटल स्टेटस: सिंगल
अॅक्टिव्ह: 2000पासून
शिल्पा शिंदे देसी लूक, अदा आणि निरागसतेमुळे कमी वेळेतच लोकप्रिय झाली. 'भाभीजी घर पर है' मालिकेच्या माध्यमातून ती 'अंगूरी भाभी' नावाने लोकप्रिय झाली. ती दिशासारखी ती वादांपासून वेगळे राहू शकत नाही. कधी ती लग्नामुळे तर कधी ती चॅनल आणि निर्मात्यांसोबतच्या वादामुळे चर्चेत राहते. शिल्पाने दिशासारखे बॉलिवूड सिनेमांत काम केले नाहीये. परंतु दाक्षिणात्य सिनेमे केले आहेत. ती 'भाभीजी घर पर है'पूर्वीच टीव्हीचा एक ओळखीचा चेहरा होती. 2015मध्ये तिने 'इंडियन टेली अवॉर्ड'दरम्यान उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दोघींच्या आयुष्यातील रंजक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...