आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daya Fed Cake Birthday Boy Jethalal, See More Pics

सेटवर जेठलालचा वाढदिवस झाला साजरा, पाहा स्टारकास्टची धमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सब टीव्हीवर प्रसारित होणारा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा लोकप्रिय कॉमेडी शोमधील जेठलाल गडाची भूमिका साकारणा-या दिलीप जोशी यांनी काल (26 मे) आपला 49वा वाढदिवस साजरा केला. यावेळी शोची पूर्ण स्टारकास्टने धमाल केली.
दिलीप म्हणतात, त्यांनी कधीच त्यांचा वाढदिवस साजरा केला नाही. तरुण असताना त्यांनी आजच्या तरुणपिढी प्रमाणे वाढदिवस साजरा केला नाही. कारण त्यावेळी बर्थडेसाठी लागणारे पैसे जमा करू शकत नव्हतो.
सेटवर दिलीप यांनी सांगितले, आपल्या आई-वडिलांचा आशिर्वाद घेऊनच ते आपला बर्थडे सेलिब्रेट करत होते. त्यांचा बर्थडे उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये असल्याने शाळेतसुध्दा सेलिब्रेट करता येत नव्हता.
त्यांच्यासाठी हे सेलिब्रेशन खूप मोठे होते. परंतु मी आपला बर्थडे रिअल लाइफमध्ये साजरा करू शकलो नसते. मी सतत शुटिंगमध्ये व्यस्त असतो असेही दिलीप यांनी सांगितले.
यावेळी त्यांची को-स्टार आणि रील लाइफ पत्नीचे पात्र साकारणारी दिशा वक्कानीनेसुध्दा दिलीप यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दिशा म्हणाली, की दिलीप यांनी भविष्यात सुख-शांती मिळो. दिलीप सेटवर सर्वांसाठी एक चांगले मेंटर आहेत. त्यांच्यासारखा अभिनय कुणी करू शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा दिलीप जोशी यांच्या वाढदिवसाची छायाचित्रे...