आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'डील वाली दुल्हनिया'च्या प्रीमियरला जमली टीव्ही स्टार्सची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('डील वाली दुल्हनिया'च्या प्रीमियरला उपस्थित टीना दत्ता आणि जसवीर कौर)
मुंबई- अभिनेत्री मनीषा खटवानी आणि सचिन पारिख यांची निर्मिती असलेल्या 'डील वाली दुल्हनिया' या नाटकाचा खास शो टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसाठी आयोजित करण्यात आला होता. वांद्रास्थित हॉटेल रंगशारदा येथे हा शो रंगला.
अभिनेता करण मेहरा पत्नी निशा रावलसोबत दिसला. नेहा बग्गा, शिल्पा सकलानी, अपूर्व अग्निहोत्री, नासिर हे सेलेब्सुद्धा मनीषा आणि सचिनला चिअर करण्यासाठी येथे आले होते. विद्या माळवदे, अमित वर्मा आणि जसवीर कौर या कलाकारांच्या या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या शोची निर्माती मनीषा खटवानी 2012मध्ये 'सरवाइवर इंडिया' या कार्यक्रमात झळकली होती. तर सचिन पारिखने 'काली : एक अग्नि परीक्षा' आणि 'परदेश में मिला कोई अपना सा' या शोमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नाटकाच्या प्रीमिअरला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...