आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपिलच्या शोमध्ये या ग्लॅमरस अॅक्ट्रेसची होणार एंट्री, जाणून घ्या कुणाची बायको बनणार?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देबिना बॅनर्जी आणि किकू शारदा - Divya Marathi
देबिना बॅनर्जी आणि किकू शारदा
मुंबई: देबिना बॅनर्जी लवकरच 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये ती किकू शारदाच्या हॉट आणि ग्लॅमरस पत्नीच्या रुपात दिसणार आहे. स्वत: देबिनाने याविषयी पुष्टी करून सांगितले, 'मी शोमध्ये किकू शारदाची ग्लॅमरस पत्नी बनणार आहे. ती त्याच्यासोबत कपिलच्या साडी स्टोरमध्ये काम करेल. जर हे कॅरेक्टर लोकांना पसंत पडले तर ते पुढे कायम केले जाईल.'
मयूरी आणि सीता झाल्या आहेत लोकप्रिय...
देबिनाला प्रेक्षकांनी 'रामायण' मालिकेत सीता आणि 'चिडियाघर'मध्ये मयूरीच्या पात्रात पाहिले आहे. दोन्ही पात्र इतके लोकप्रिय झालेत, की तिला आजसुध्दा सीता आणि मयूरी नावाने ओळखले जाते.
तामिळमध्ये मिळाला होता पहिला शो...
देबिनाला पहिला टीव्ही प्रोजेक्ट तामिळ भाषेत मिळाला होता. 2005मध्ये आलेल्या या शोचे नाव 'मायाबी' होते. त्यानंतर ती सतत छोट्या पडद्यावर दिसू लागली. 2008मध्ये एनडीटीव्ही इमॅजिनवर येणारा 'रामायण' शोमध्ये ती सीताच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. शिवाय देबिनाने 'पति,पत्नी और वो', 'जोर का झटका', 'स्टार या रॉकस्टार', 'वेलकम : बाजी मेहमाननवाजी की', 'नच बलिए-6' आणि 'खतरो के खिलाडी-7'सह अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे.
'रामायण'दरम्यान झाली गुरमीतसोबत ओळख...
'रामायण' मालिकेत सीतेची भूमिका साकारत असताना तिची भेट अभिनेता गुरमीत चौधरीसोबत झाली. गुरमीत या शोमध्ये 'रामा'चे पात्र साकारत होता. रील लाइफमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारणारे हे स्टार्स केव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले, त्यांनाच कळाले नाही. 2011मध्ये देबिना आणि गुरमीतने लग्न केले.
सिनेमांतसुध्दा केलेय काम...
देबिनाने स्वत:चे कौशल्य केवळ टीव्ही पूरतेच मर्यादीत ठेवले नाही. तिने रुपेरी पडद्यावरसुध्दा नशीब आजमावले. 2003मध्ये लॉरेन्स डिसूजा दिग्दर्शित 'इंडियन बाबू' सिवेमात गुरलीन चोप्राच्या सावत्र बहिणीची भूमिका साकारली होती. इतकेच नव्हे तर ती तेलगू आणि तामिळ सिनेमांतसुध्दा झळकली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा देबिनाचे ग्लॅमरस फोटो...
बातम्या आणखी आहेत...