(दीपिका पदुकोण, दिशा वाकाणी)
मुंबई- शनिवारी (2 मे) दीपिका पदुकोण 'पिकू' सिनेमा प्रमोट करण्यासाठी 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर पोहोचली होती. यादरम्यान दीपिका ट्रॅडिशनल अवतारात दिसली. तिने डिझाइनर तरुण बहलचा ब्लू अँड ग्रे लहंगा परिधान केला होता.
टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर दीपिकाने शोची मुख्य कलाकर दया बेन (दिशा वाकाणी)सोबत गरबा आणि फुगडी खेळली. सेटवर उपस्थित स्टार्ससोबत दिपिकाने ठुमके लावले.
अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान अभिनीत 'पिकू'चे दिग्दर्शन सूजित सरकारने केले आहे. एमएसएम मोशन पिक्चर्स, सरस्वकी एंटरटेन्मेंट लिमिटेड आणि रायजिंग फिल्म्स हा सिनेमा 8 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'तारक मेहता...'च्या सेटवर पोहोचलेल्या दीपिकाची धमाल-मस्तीची छायाचित्रे...