आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CONFIRMED : दीपिका, आशिषसह हे सेलेब्स असतील 'झलक दिखला जा 8'चे स्पर्धक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून वर- आशिष चौधरी, खाली - राधिका मदान, उजवीकडून वर- दीपिका सॅमसन, खाली - नेहा मर्दा)
मुंबईः 'झलक दिखला जा' या प्रसिद्ध डान्सिंग रिअॅलिटी शोचे नवे पर्व लवकरच छोट्या पडद्यावर दाखल होणारेय. जून 2015 पासून हा शो सुरु होतोय. सेलिब्रिटी डान्सिंग कॉन्सेप्टवर आधारित या शोसाठी निर्मात्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींना विचारणा केली आहे. यापैकी अभिनेत्री दीपिका सॅमसन, आशिष चौधरी, राधिका मदन आणि कविता कौशिक या सेलिब्रिटींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दीपिका सॅमसन सध्या कलर्स टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या 'ससुराल सिमर का' मालिकेत सिमर हे पात्र साकारत आहे. तर मॉडेल आणि अभिनेता आशिष चौधरी अलीकडेच संपलेल्या 'खतरों के खिलाडी' या शोचा विजेता ठरला आहे. राधिका मदन कलर्स वाहिनीवरील 'मेरी आशिकी तुम से ही' या मालिकेत ईशानी हे पात्र साकारत आहे. अभिनेत्री कविता कौशिक गाजलेल्या 'एफआयआर' या विनोदी मालिकेत झळकली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या शोसाठी आणखी काही सेलिब्रिटींना विचारणा झाली आहे. काहींनी त्यासाठी होकार दिला आहे. मात्र अद्याप अनेकांसोबत फायनल कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यात आलेला नाही. सध्या त्यावर बोलणी सुरु आहेत.
ऐकिवात आहे, की 'महाराणा प्रताप' या मालिकेतील बालकलाकार फैजल खानने या शोसाठी रिहर्सल्स सुरु केल्या आहेत. जेव्हा divyamarathi.com ने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांने सांगितले, की मागील पर्वासाठीसुद्धा त्याला विचारणा झाली होती. मात्र त्यावेळी महाराणा प्रताप या मालिकेत बिझी असल्याने तो शोमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता.
फैजल म्हणाला, "या नवीन पर्वासाठी मी सध्या काही सांगू शकत नाही. मात्र शोसाठी विचारणा झाली हे खरे आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शोसाठी विचारणा झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...