आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Singh And Devoleena Bhattacharjee Will Promote Siya Ke Ram

शूटिंगवेळी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसल्या 'संध्या बिंदणी' आणि 'गोपी बहू'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका सिंह आणि देवोलिना भट्टाचार्जी - Divya Marathi
दीपिका सिंह आणि देवोलिना भट्टाचार्जी

मुंबईः अलीकडेच टीव्ही इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध सूना अर्थातच गोपी बहू आणि संध्या बिंदणी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसला. निमित्त होते स्टार प्लस वाहिनीवर नव्याने दाखल होत असलेल्या 'सिया ये राम' या मालिकेच्या प्रोमो शूटचे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'सिया के राम' ही स्त्री केंद्रित पौराणिक मालिका आहे. स्टार प्लसच्या या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी या चॅनवरील विविध मालिकांमधील सूना अर्थातच इशिता उर्फ दिव्यांका त्रिपाठी (ये है मोहब्बतें फेम), संध्या उर्फ दीपिका सिंह (दीया और बाती हम फेम), अक्षरा उर्फ हिना खान (ये रिश्ता क्या कहलाता है फेम) आणि गोपी बहू उर्फ देवोलिना भट्टाचार्जी (साथ निभाना साथिया फेम) यांची निवड करणअयात आली आहे. प्रोमोजमध्ये या सर्वजणी सीतेचा प्रवास कथन करताना दिसली. दीपिका आणि देवोलिना यांनी प्रोमो शूट पूर्ण केले आहे.
आशिष शर्मा रामाच्या भूमिकेत
'सिया के राम' या मालिकेचे निर्माते निखिल सिन्हा असून येत्या 16 नोव्हेंबरपासून ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. या मालिकेत आशिष शर्मा भगवान राम आणि मदिराक्षी मुंदले सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शोमध्ये प्रसिद्ध अभिनेते दलीप ताहिल दशरथाच्या भूमिकेत असतील.
प्रोमो शूटिंगचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
सर्व फोटोजः अजीत रेडेकर