आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Singh, Ruslaan Mumtaz, Ranvijay Singha, Jay Soni: TV Celebs Who Married This Year

WEDDING ALBUM: दीपिका, रुझलानसह हे TV स्टार्स यावर्षी अडकले लग्नगाठीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेलिव्हिजन जगतात सध्या सनई चौघड्यांचे सूर कानी पडत आहेत. अलीकडेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंह दिग्दर्शक रोहित राय गोयलसह लग्नबेडीत अडकली. धुमधडाक्यात त्यांच्या लग्नसोहळा पार पडला. अनेक टीव्ही स्टार्स त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लग्नात सामील झाले होते.
यावर्षी म्हणजेच 2014मध्ये लग्नगाठीत अडकणारी दीपिका एकमेव टीव्ही स्टार नाहीये. तिच्यापूर्वी बरेच स्टार्स यावर्षी बोहल्यावर चढले.
'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रक्षंदा खान टीव्ही स्टार सचिन त्यागीसह लग्नगाठीत अडकली. 15 मार्च रोजी थाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नात रक्षंदा आणि सचिनचे खास मित्र सहभागी झाले होते. पाहुण्यांमध्ये मोना सिंह, शिल्पा अग्निहोत्री, निगार खान यांचा समावेश होता.
तर 'रोडीज' या टीव्ही रिअॅलिटी शोचा विजेता आणि गेल्या काही वर्षांपासून याच शोचा होस्ट असलेला रणविजय सिंहसुद्धा याचवर्षी लग्नगाठीत अडकला. मुळची लंडनची रहिवाशी असलेल्या प्रियांका व्होरासह रणविजय बोहल्यावर चढला.

'कहता है दिल जी ले जरा' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता रुसलान मुमताजसुद्धा त्याची गर्लफ्रेंड निराली मेहतासह लग्नगाठीत अडकला. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी या दोघांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर 2 मार्च रोजी गुजराती पद्धतीने हे दोघे विवाहबद्ध झाले.
'ससुराल गेंदा फूल' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता जय सोनी देखील यावर्षी 18 फेब्रुवारीला बोहल्यावर चढला. गर्लफ्रेंड पूजा शाहसोबत जय लग्नबेडीत अडकला.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला यावर्षी लग्नगाठीत अडकलेल्या टीव्ही स्टार्सच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा न्यूली वेड्स कपल्सचे WEDDING PHOTOS...