आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : तीन महिन्याच्या मुलाबरोबर बाप्पाच्या दर्शनाला पोहोचली \'संध्या बींदणी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा सोहमसह दीपिका. - Divya Marathi
मुलगा सोहमसह दीपिका.
एंटरटेनमेंट डेस्क - टीव्ही शो 'दीया और बाती हम' ची 'संध्या बींदणी' म्हणजेच दीपिका सिंहने तिचा तीन महिन्यांचा मुलगा सोहमबरोबर सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी तिचा पती रोहित राज गोयलही तिच्याबरोबर होता. सिद्धिविनायक मंदिरात सोहमची ही पहिलीच भेट होती. तो आईच्या कडेवर असल्याचे पाहायला मिळाले. गणपती दर्शनानंतर दीपिकाने सोहमच्या डोक्यावर टिळा लावला. त्यादरम्यान सोहमने लायनिंगचा सूट आणि कॅप परिधान केली होती. तर दीपिका डार्क पिंक कलरच्या सूटमध्ये झळकली. तिने सोहमबरोबरचा फोटो इन्स्टाग्रावरही शेयर केला. फोटोबरोबर तिने कॅप्शन दिले, 'Soham's first #siddivinayak Darshan & coincidentally we met our friend Deepak chaddaji also. Beautiful Darshan, beautiful experience. दीपिकाने याचवर्षी 20 मे रोजी मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती पूर्ण वेळ मुलाला देत आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...