आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Brothers Win KBC\'s Maha Jackpot Worth Rs 7 Cr

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KBC: पहिल्याच प्रश्नात अडखळले होते नरुला बंधू, तरी बनले महाकरोडपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- सार्थक नरुला, अचिन नरुला आणि अमिताभ बच्चन)
मुंबई: 'केबीसी'च्या आठव्या पर्वाला पहिल्यांदा असे सर्व रक्कम जिंकणारे विजेते मिळाले आहेत. या स्पर्धकांनी 7 कोटींची रक्कम जिंकली आहे. 'KBC'च्या 14 प्रश्नांची उत्तरे देणारे स्पर्धक अचिन आणि सार्थक नरुला हे दिल्लीचे रहिवाशी आहेत. 'केबीसी'सह भारतीय टीव्हीच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी रक्कम एखाद्या स्पर्धकांनी जिंकली आहे. हा एपिसोड अद्याप प्रसारित झालेला नसून याची तारिखदेखील निश्चित नाहीये.
दोन्ही भावांची ही जोडी 'केबीसी'च्या स्पेशल एपिसोडमध्ये सामील झाली. त्यामध्ये दोघांनी 7 कोटी रुपयांसह अमिताभ बच्चन आणि प्रेक्षकांचेही मन जिंकले आहे. आमिताभ या भावांच्या आत्मविश्वाने खेळण्याच्या पध्दतीने खूप प्रभावित झाले. बिग बी म्हणाले, 'दोघांनी लाइफ लाइनचा वापर केला मात्र त्यांना त्याची गरजच नव्हती असे त्यांच्या आत्मविश्वासावरून दिसून आले. लाइफ लाइन वापरण्यापूर्वी दोघे उत्तराचे संकेत देत होते.'

पहिल्या दिवशी जिंकले 20 हजार रुपये
अचिन-सार्थक यांनी जोडी हॉट सीटवर पोहोचल्यानंतर त्यांनी 3 प्रश्नांची उत्तरे देऊन 20 हजार रुपये जिंकले होते. त्या दिवशी शोची वेळ संपल्याने त्यांना गेम थांबवावा लागला होता. दुस-या दिवशी दोन्ही भाऊ हॉट सीटवर आल्यानंतर त्यांनी कौशल्य आणि आत्मविश्वाने दिलेल्या उत्तरांनी प्रत्येकाचे मन जिंकले.
पहिल्याच प्रश्नात अडकले होते
सार्थक म्हणाला, 'आम्ही पहिल्याच प्रश्नात अडकलो होतो. प्रश्न होता, की इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये कोणता मोड वापरला जातो. हा ट्रिकी प्रश्न होता. मी स्टँडबाय आणि फ्लिपमुळे गोधळून गेली होतो. कारण मी लॅपटॉप वापरतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर लक्षात आले.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या या भावांची पुढील कहानी आणि या एपिसोडमध्ये विचारण्यात आलेले कठिण प्रश्न...