Home »TV Guide» Devon Ke Dev Mahadev Actor Piyush Sahdev Divorce

'देवों के देव: महादेव' मधील राम घेणार घटस्फोट, एक्स्ट्रा मेरिटल अफेयर बनले कारण

दिव्य मराठी वेब टीम | Aug 11, 2017, 15:33 PM IST

मुंबई - टीवी शो 'देवों के देव: महादेव' मधील रामाची भूमिका करणारा अभिनेता पीयूष सहदेव सध्या त्याच्या वैयक्तिक कारणाने चर्चेत आहे. अशी माहिती मिळते की, पीयूष त्याची पत्नी आकांक्षा रावतपासून घटस्फोट घेणार आहे. नुकतेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.सध्या सोबत राहत आहेत आकांक्षा-पीयूष..
- नुकतेच पीयूषने आमच्या प्रतिनीधीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, आम्ही गेल्या 3 वर्षापासून सोबत राहत आहोत आणि लवकरच घटस्फोट घेणार आहोत.
- जोपर्यंत आम्ही पूर्णपणे वेगळे होत नाही तोपर्यंत या विषयावर काहीच बोलणार नाही.
- आकांश्राला याबाबतीत विचारले असता तिने यावर बोलण्यास साफ नकार दिला.
- पीयूष सध्या वेब सीरीज 'बेहद'मध्ये अभिनय करत आहे.
एक्सट्रा मॅरीटल अफेअर बनले कारण..
- मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष सध्या 'बेहद' च्या क्रिएटिव टीममधील एका मुलीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
- यावर पीयूषने या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे.
- पीयूषने पत्नीपासून विभक्त होण्याचे कारण त्या दोघांचे वेगळे विचार आणि लाईफ स्टाईल असल्याचे सांगितले आहे.
- जून 2012 साली पीयूष-आकांक्षाने लग्न केले होते.
'बजरंगी भाईजान' मधील अभिनेत्रीचा भाऊ आहे पीयूष..
- बजरंगी भाईजान' चित्रपटात हर्षालीच्या आईचा रोल करणाऱ्या मेहर विजचा भाऊ आहे पीयूश.
- मेहरने चित्रपटात पाकिस्तानी महिला शाहिदाची भूमिका केली होती.
- मेहरने याअगोदर 'लकी नो टाइम फॉर में लव'(2005), 'तुम बिन-2'(2016) या चित्रपटात काम केले आहे. आता ती आमिर खानच्या 'सीक्रेट सुपरस्टार'मध्ये दिसणार आहे.

या शोमध्ये केले आहे पीयूषने काम..
- पीयूषने 2007 साली 'हर घर कुछ कहता है'पासून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
- यानंतर त्याने 'मीत मिला दे रब्बा'(2008), 'गीत'(2010), 'मन की आवाज प्रतिज्ञा'(2011), 'सुपरकॉप विथ सुपरविलन्स'(2012), 'सपने सुहाने लड़कपन के'(2013) या मालिकांत अभिनय केला.
- सध्या तो 'देवदासी'मध्ये काम करत आहे.

पुढच्या स्लाईडवर पाहा, पीयूषचे फॅमिलीसोबतचे फोटोज्..

Next Article

Recommended