आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बघा \'देवो के देव... महादेवा\'चा रिअल अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'महादेव'ला देवांचा देव मानले जाते. तो श्रेष्ठांपेक्षा श्रेष्ठ आहे. तो सर्व जगात पूजनीय आहे आणि आज (27 फेब्रुवारी) महाशिवरात्री आहे. सर्वत्र महादेवाच्या नावाचा जप चालू आहे.
आज आम्ही तुम्हाला टीव्हीवर येणा-या अशा महादेवाविषयी जो आज लोकांमध्ये लोकप्रिय आहे. टीव्हीवर आता लोक या महादेवाला बघण्यासाठी खूप उत्सूक असतात. हा महादेव म्हणजे, मोहित रैना आहे.
'देवो के देव...महादेव' या मालिकेत महादेवाची भूमिका मोहित रैना सध्या साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे आणि त्याच्या चाहत्यांची मोठी संख्या वाढली आहे. मोहितही त्याच्या लोकप्रियतेमुळे खूप आनंदी आहे.
कोण आहे मोहित रैना?
मोहित हा टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता आहे. परंतु त्याला सर्वाधिक लोकप्रियता टीव्ही मालिकेतून मिळाली आहे. मोहितने आतापर्यंत 'डॉन मुत्थु स्वामी' या एकाच सिनेमात काम केले आहे. मोहितने 'देवो के देव...' मालिकेव्यतिरिक्त इतर मालिकांमध्येही काम केले आहे.
मोहितने खालील काही मालिकांमध्ये काम केले आहे-
‘अंतरिक्ष-एक अमर कथा’ : 2004-2005
‘भाभी’ : 2005
‘चेहरा’ : 2009
‘बंदिनी’: 2010
‘गंगा की धीज’ : 2011
‘देवों के देव... महादेव’ : 2011 (सध्या चालू आहे)
‘महाभारत’ : 2013
‘कथा महादेव पुत्र बाल गणेश की’ : 2013 (सध्या चालू आहे)
मोहितला महादेवाची भूमिका साकारताना कोणती अडचण येते?
मोहित 'देवो के देव...'मधील त्याच्या भूमिकेमुळे खूप आनंदी आहे. परंतु कुणी जेष्ठ व्यक्ती त्याचे पाय पडतो तेव्हा मात्र त्याला खूप वाईट वाटते. तो अनेकदा अशा प्रसंगांना टाळण्याचा प्रयत्न करतो.
मोहितजवळ सिनेमांसाठी वेळ नाही
मोहित रैना 'देवो के देव...' मालिकेसाठी जवळपास 12 तासांचा वेळ देतो. म्हणून त्याचा सर्वाधिक वेळ या मालिकेच्या सेटवर जातो. सध्या त्याला कोणत्या सिनेमाचे ऑफर आलेले नाहीत. परंतु त्यालाही त्यासाठी वेळ नाहीये. मोहितच्या मते, छोटा पडदा फक्त नावालाच छोटा पडदा आहे. परंतु इथे स्टार्सना लोकप्रियता आणि नाव कमवण्याची संधी मिळते. तसे पाहता महादेवाची भूमिका साकारणारा मोहित ख-या आयुष्यात खूप स्टाइलिश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मोहितची खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे...