आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप केसमध्ये अॅक्टरला अटक, या मुळे 8 महिन्यांपासून पत्नी राहाते वेगळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी आकांक्षा रावतसोबत पीयूष सहदेव. - Divya Marathi
पत्नी आकांक्षा रावतसोबत पीयूष सहदेव.

मुंबई - 'देवों के देव: महादेव'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारा अॅक्टर पीयूष सहदेवला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात अटक केली आहे. रिपोर्टनुसार, एका अॅक्ट्रेसने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन पीयूषला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनेच वरिष्ठ पोलिस अधिकारी किरण काळे यांनी ही माहिती दिली.

 

पिता आणि पत्नीला नाही माहित पीयूषबद्दल... 
- पीयूषला अटक झाल्यानंतर त्याच्या वडिलांकडे याबद्दल विचारणार करण्यात आली तेव्हा त्यांनी काहीच माहित नसल्याचे सांगितले. 
- ते म्हणाले, की ते सध्या दिल्लीमध्ये आहेत. लवकरच याबद्दल माहिती मिळवतो. 
- दुसरीकडे त्याची पत्नी आकांक्षा रावतच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 महिन्यांपासून ती त्याच्या टचमध्ये नाही. त्यामुळे तिला याबद्दल काहीच माहित नाही.  

 

एप्रिल 2017 पासून पत्नीपासून विभक्त 
- पीयूष आणि त्याची पत्नी आकांक्षा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. हे दोघे एप्रिल 2017 पासून वेगळे राहात आहेत. याचा खुलासा स्वतः पीयूषने DainikBhaskar.com ला दिलेल्या मुलाखतीत केला होता. तेव्हा तो म्हणाला होता, 'होय, आम्ही सोबत राहात नाही. लवकरच आम्ही घटस्फोट घेणार आहोत.'
- तेव्हा आकांक्षाने या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला होता. 

 

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठरले कारण
- पीयूष 'देवो के देव: महादेव'मध्ये रामाच्या भूमिकेत आहे, तर 'बेहद' सारख्या टीव्ही शोमध्येही त्याने काम केले आहे. 
- आकांक्षा आणि पीयूष यांच्यातील वादाचे कारण त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे म्हटले जाते. 
- 'बेहद' च्या क्रिएटीव्ह टीममधील एका मुलीसोबत त्याची जवळीक वाढली होती, आणि त्यामुळेच कपलमध्ये वाद सुरु झाला होता. 
- पीयूष आणि आकांक्षा यांनी बराच काळ डेटिंगनंतर लग्नाचा निर्णय घेतला होता. जून 2012 मध्ये त्यांनी विवाह केला होता. 

 

या शोमध्ये होता पीयूष 
पीयूषने टीव्ही करिअरची सुरुवात 2007 मध्ये 'हर घर कुछ कहता है' मधून केली होती. 
- त्यानंतर त्याने 'मीत मिला दे रब्बा'(2008), 'गीत'(2010), 'मन की आवाज प्रतिज्ञा'(2011), 'सुपरकॉप विथ सुपरव्हिलन्स'(2012), 'सपने सुहाने लड़कपन के'(2013) सारख्या सीरियलमध्ये काम केले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पीयूष आणि आकांक्षाचे फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...