(फाइल फोटो- डिआंड्रा सॉरेस)
मुंबई- बातम्या आल्या होत्या, की डिआंड्रा सॉरेसला प्रेग्नेंसीमुळे
बिग बॉसच्या घराबाहेचा रस्ता दाखवला. परंतु डिआंड्राने या बातम्यांना खोट्या असून त्यात काहीही सत्य नसल्याचे सांगितले आहे. रविवारी (14 डिसेंबर) डिआंड्राचे एविक्शन झाले आणि बाहेर आल्यानंतर तिने मुलाखत दिली. त्यामध्ये तिने सांगितले, की तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या साफ खोट्या आहेत. तिने सांगितले, 'फक्त Kiss केल्याने कुणी प्रेग्नेंट होत नाही. हॉस्पिटलमध्ये चेकअपविषयी सांगायचे झाले तर, काही दिवसांपासून तब्येत ठिक वाटत नव्हती म्हणून रुटीन टेकअप करण्यासाठी गेले होते.'
डिआंड्राने या मुलाखतीत स्वीकारले, की ती गौतमविषयी गंभीर होती. तिने सांगितले, 'मी गौतमवर खरंच प्रेम करत होते आणि हे खोटे नव्हते.' मात्र, यावेळी तिने असेही सांगितले, की गौतमच्या कुटुंबीयांनी तिला कधीच सून म्हणून स्वीकर केले नसते.
डिआंड्राच्या बॉडीवर 25 टॅटू आहेत. तिल विचारण्यात आले, की ती गौतमच्या नावाचा टॅटू कधी गोंदवून घेणार आहेय़ यावर ती म्हणते, 'कधीच नाही.' 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येण्यापूर्वी गौतमने डिआंड्राशी ब्रेक-अप केले होते.
कोन आहे डिआंड्रा?
डिआंड्रा सॉरेस एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 13 ऑगस्ट 1979 रोजी मुंबईमध्ये जन्मलेली डिआंड्रा मॉडेलिंग जगात बाल्ड मॉडेल म्हणून प्रसिध्द आहे. ती 16 वर्षांची असताना तेव्हापासून मॉडेलिंगमध्ये सक्रिय आहे. मात्र, बातम्यांनुसार, तिने वयाच्या 13व्या वर्षीच ठरवले होते, की तिला मॉडेलिंग करायचे आहे. तिला हे क्षेत्र निवडण्याची प्रेरणा माजी मॉडेल मधु सप्रेकडून मिळाली आहे. 1992मध्ये मधु सप्रेने फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब जिंकला होता.
डिआंड्राचे अभिनय करिअर जास्त प्रसिध्द नाहीये. परंति तिने आजच्या आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत काम केलेले आहे. 2003मध्ये आलेल्या 'बूम' सिनेमात ती कतरिनासोबत झळकली होती. त्यानंतर 2008मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फॅशन' सिनेमात ती प्रियांकासोबत दिसली होती. मात्र, तिला अद्याप कोणतीच मुख्य भूमिका मिळालेली नाहीये.
टीव्हवर यापूर्वीसुध्दा दिसली आहे-
असे नाही, की '
बिग बॉस-8'च्या माध्यमातून डिआंड्रा पहिल्यांदाच टीव्हीवर दिसली आहे. यापूर्वी ती 2011मध्ये रिअॅलिटी शो 'फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी'च्या चोथ्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसली आहे. शिवाय 'लाइफ मे एक बार'च्या पर्वातसुध्दा तिने काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिआंड्राच्या आयुष्यातील काही छायाचित्रे...