आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diandra Speaks About Her Relationship With DJ Whosane

BB8: Ex-बॉयफ्रेंडच्या आठवणीने इमोशनल झाली डिआंड्रा, पाहा तिचे मॉडेलिंग आणि खासगी Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: डिआंड्रा सॉरेस आणि डीजे होसेन)
मुंबई: 'बिग बॉस 8'च्या घरात सजावटीने तिचा माजी बॉयफ्रेंड डीजे होसेनची आठवण करून दिली. अलीकडेच, ती तिच्या सह-स्पर्धकाला सांगत होती, की तिने आणि डीजे होसेनने कशाप्रकारे 12 वर्षांच्या लिव्ह-इन-रिलेशनदरम्यान घराची सजावट केली होती.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'इतर स्पर्धकांनी ती तिच्या आठवणी सांगताना खूपच इमोशनल झालेली दिसली. यावेळी तिने सांगितले, की एखाद्या व्यक्तीला आयुष्यात निवडण्यासाठी ती पूर्णत: बालीश आहे.' यादरम्यान डिआंड्राने करिअरमध्ये केलेली साम्यंजस्य आणि रिलेशनमध्ये मिळेलेल्या इंटरनॅशनल आसाइनमेन्ट्सचा उल्लेखसुध्दा तिने केला. एवढेच नव्हे, तिने सांगितले, की होसेन तिच्या प्रथमिकता बनला होता. परंतु त्यांचे ब्रेक-अप झाल्यानंतर डिआंड्रा पूर्णत: खचून गेली होती. तिला पुन्हा मॉडेलिंगमध्ये येण्याची इच्छा होती, परंतु 35 वर्ष, हिरवे केस, आयर टॅटूजमुळे तिच्यासाठी हे सर्व कठिण होते.
कोण आहे डिआंड्रा
डिआंड्रा सॉरेस एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 13 गस्ट 1979 रोजी मुंबईमध्ये जन्मलेली डिआंड्रा वयाच्या 16व्या वर्षीपासून मॉडेलिंगमध्ये आहे. तिने वयाच्या 13व्या वर्षीच मॉडेलिंगमध्ये येण्याचा निश्चय केला होता. तिला हे क्षेत्र निवडण्यासाठी माजी मॉडेल मधु सप्रेकडून प्रेरण मिळाली. (मधुने 1992मध्ये फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब नावी केला होता आणि ती मिस यूनिव्हर्स स्पर्धेत सेकंड रनरअप होती) फॅशन शोदरम्यान डिआंड्राला बाल्ड लूकमध्येच सर्वाधिक पाहिले जाते.
कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत केले आहे काम
डिआंड्राचे अभियनतील करिअर जास्त मोठे नाहीये. परंतु ती आजच्या आघाडीच्या अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत सिनेमात दिसली आहे. 2003मध्ये ती कतरिनाच्या 'बूम' या पदार्पण सिनेमात दिसली होती आणि प्रियांकासोबत 'फॅशन'मध्ये तिने एक छोटी भूमिका साकारली होती. तिला आतापर्यंत कोणताच मोठा आणि मुख्य भूमिकेचा सिनेमा मिळालेला नाहीये.
टीव्हीवर यापूर्वीसुध्दा झळकली आहे
असे नाही, की 'बिग बॉस 8'मधून डिआंड्रा पहिल्यांदा टीव्हीवर दिसली आहे. यापूर्वी ती 2011मध्ये 'फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी'च्या चौथ्या पर्वात एक स्पर्धक म्हणून सगभागी झाली होती. याशिवाय, 'लाइफ मे एक बार'च्या दुस-या पर्वातसुध्दा दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डिआंड्राच्या खासगी आयुष्यातील काही निवडक छायाचित्रे...