आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'DID 4′ Winner Shyam Yadav Has Bollywood Dreams News In Amrathi

डीआयडी विजेता श्यामला बॉलीवूडचे वेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डीआयडी म्हणजेच डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या चौथ्या पर्वाचा विजेता श्याम यादवला बॉलीवूडचे वेध लागले आहेत. श्याम हा मुंबईचाच आहे. चित्रपटांमध्ये कोरिओग्राफीसह (नृत्यदिग्दर्शन) अभिनयात नशीब आजमावण्याचे त्याचे स्वप्न आहे.

17 वर्षीय श्याम याने नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. सलमान खानच्या सुपरहिट दबंग या चित्रपटातील एका गाण्यातही तो बॅक अप आर्टिस्ट म्हणून चमकला होता. सलमान हाच आपल्या स्वप्नामागील आदर्श असल्याचे श्यामचे म्हणणे आहे. माझ्या आईवडिलांनी नेहमीच मला पाठिंबा दिला. मला टीव्ही पाहण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळेच नृत्यात करिअर करण्याबाबत गांभीर्याने विचार केल्याचे श्याम म्हणाला. बॉलीवूडमध्ये अभिनयासारख्या इतर क्षेत्रांत प्रवेश करण्याचे मार्ग याद्वारे सापडू शकतात, असे त्याचे मत होते. सर्वप्रथम कोरिओग्राफर बनण्यालाच प्राधान्य असून पुढे संधी मिळाली तर अभिनय करणार असल्याचे श्यामने सांगितले. सलमान खान आणि फरहान अख्तर हे श्यामचे आदर्श आहेत.

प्रेक्षकांनी घेतले डोक्यावर
शोमध्ये सर्व प्रकारच्या नृत्यांचे उत्तम असे सादरीकरण करून परीक्षकांची दाद मिळवली होती. तसेच देशभरातील प्रेक्षकांनीही त्याला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे इतरांना पछाडत श्यामला विजयी कामगिरी करण्यात आली.

शोचे विजेतेपद मिळवलेल्या श्यामला ‘तकदीर की सुनहरी टोपी’, एक कार आणि झी टीव्ही बरोबर रिअ‍ॅलिटी शोसाठी तीन वर्षांचा करारही मिळाला आहे. कोरिओग्राफर मुदस्सर खान, फिरोज खान आणि श्रुती मर्चंट हे या पर्वात परीक्षकाच्या भूमिकेत होते. श्याम हा मुद्स्सर यांच्या फायर अकॅडमी ऑफ डान्सचा विद्यार्थी आहे. परिश्रमानेच हा शो जिंकता आल्याचे त्याचे म्हणणे आहे. मुदस्सर सरानंी दिलेल्या संधीमुळेच या शोमध्ये सहभागी झालो होतो, असेही श्यामने अभिमानाने सांगितले.