आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did Pratyusha Banerjee Borrow Money From Her Maid?

नवीन खुलासा: औषध, टॅक्सीसाठी मोलकरणीकडून पैसे उधार घ्यायची प्रत्युषा?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्युषा बॅनर्जी - Divya Marathi
प्रत्युषा बॅनर्जी
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. आता तिच्या घरात मोलकरणीच्या रुपात काम केलेल्या रेणू सिन्हाने दावा केला, की प्रत्युषा औधष आणि टॅक्सीसाठी तिच्याकडून पैसे उधार घेत होती. इतकेच नव्हे तर रेणूने असेही सांगितले, की मध्यरात्री तिने अनेकदा प्रत्युषा आणि राहुल यांच्यात झालेला वाद ऐकला आहे. दोघांच्या खोलीतून मोठ-मोठ्याने ओरडल्याला आवाड यायचा. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, तिने हा खुलासा केला आहे.
काय म्हणाली रेणू...
- रेणू सिन्हाच्या सांगण्यानुसार, प्रत्युषाची आईने मुलीवर नजर ठेवण्यास सांगितले होते. ती तीन महिने प्रत्युषासोबत राहिल्या. प्रत्युषा तिला प्रेमाने दीदी म्हणत होती.
- रेणूने सांगितले, 'प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला तिची आई आवडत नव्हती. मी प्रत्युषाची काळजी घेत होते.'
- तिच्या आईने मला त्यांच्या मुलीवर नजर ठेवण्यास आणि काळजी घेण्यास सांगितले होते. अनेकदा मध्यरात्री राहुल आणि प्रत्युषाच्या खोलीतून भांडणाचा आवाज यायचा.
- मला प्रत्युषाला वाचवायचे होते, पण मी त्यांच्या खासगी आयुष्य दखल देऊ शकत नव्हते.
- राहुल घरातून बाहेर गेल्यानंतर प्रत्युषा मला सर्वकाही सांगत होती. ती म्हणायची, राहुल तिच्यावर एक्स-बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याचा आरोप लावतो.
- मी राहुलच्या एक्स-गर्लफ्रेंडला फ्लॅटमध्ये येऊन तमाशा करताना आणि शिवीगाळ करताना पाहिले आहे.
प्रत्युषाला धमकावत होता राहुल...
- रेणूच्या सांगण्यानुसार, प्रत्युषाला हळू-हळू राहुलच्या भूतकाळाविषयी माहिती झाले. त्यात त्याचे पहिले लग्नसुध्दा होते.
- राहुल तिला धमकावत होता. तो तिला तिचे आवडीचे कामसुध्दा करू देत नव्हता. मग ते खाण्याविषयी असो अथवा सिनेमा पाहण्याचे.
- तो प्रत्युषासोबत लग्न करण्याचे प्लानिंग करत होता.
- प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिलला राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली.
- कोकिलाबेन रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर सर्व शंका बॉयफ्रेंड राहुलवर आहेत. त्यानेच प्रत्युषाला रुग्णालयात नेले होते.
- या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रत्युषाचे PHOTOS..