आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 9: शोमधून EVICT झाली आजवरची सर्वात लहान कंटेस्टंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'एक वीर की अरदास : वीरा' या मालिकेतील वीरा अर्थातच अभिनेत्री दिगंगना सुर्यवंशी 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वातून बाहेर पडली आहे. यावेळी हे एविक्शन प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे नव्हे तर हाऊसमेट्सच्या मतांवर झाले आहे. 18 वर्षीय दिगंगना या शोमधील आजवरची सर्वात लहान वयाची स्पर्धक आहे.
दिगंगनाच्या वडिलांनी व्यक्त केला आनंद
दिगंगना बाहेर पडल्याने तिचे वडील नीरज सुर्यवंशी आनंदी आहेत. divyamarathi.com सोबत बातचित करताना ते म्हणाले, ''दिगंगना बाहेर आल्याने मी खूप आनंदी आहे. बिग बॉसचे वातावरण तिच्यासाठी ठिक नव्हते. त्यामुळे तिला तिथे चांगले वाटत नव्हते. प्रामाणिकपणे सांगू तर मला तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. आता ती बाहेर आल्याने आम्ही तिची योग्य काळजी घेऊ शकू. ती आता केवळ 18 वर्षांची आहे आणि बिग बॉसच्या घरातील परिस्थिती हाताळण्यासाठी ती खूप लहान आहे.''
आयुष्याचे सत्य दाखवणे हा होता उद्देश
दिगंगनाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, दिगंगनाला 'बिग बॉस'मध्ये पाठवण्याचा उद्देश केवळ तिला आयुष्याचे सत्य दाखवणे हा होता. ते म्हणतात, ''बिग बॉसच्या तिच्यासाठी एका गुरुकुलप्रमाणे राहिले. तिथे ती कुकिंग, साफसफाईपासून घरातील इतर कामे शिकली. घरात तिची आई तिला काहीही करु देत नाही. मात्र बिग बॉसने तिला सर्व शिकवले. माझी मुलगी खूप बदलली आहे. मला आनंद आहे, की रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयात मी तिच्यासोबत होतो. आता ती खूप प्रसिद्ध झाली आहे. पुर्वी लोकांना तिचे खरे नाव माहित नव्हते, मात्र आता तिला प्रत्येकजण दिगंगना म्हणून ओळखतात. मला तिचा अभिमान आहे.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिगंगनाच्या खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...