आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilwale Dulhania Le Jayenge Stars At \'comedy Nights\'

PHOTOS: \'कॉमेडी नाइट्स\'च्या सेटवर दिसली शाहरुख-काजोलची जबरदस्त केमिस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या सेटवर शाहरुख खान आणि काजोल)
मुंबईः प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्माचा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या शोचा मंच प्रमोशन आणि सेलिब्रेशनसाठी एक उत्कृष्ट माध्यम ठरले आहे. 1995 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमातील स्टारकास्ट अलीकडेच कपिलच्या या शोमध्ये पोहोचली होती.
मुंबईतील मराठा मंदिरात 'डीडीएलजे'ने 1000 आठवडांचा मोठा टप्पा पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ही टीम 'कॉमेडी नाइट्स...'च्या सेटवर आली होती. शाहरुख खान, काजोल, फरिदा जलाल, मंदिरा बेदी, अनुपम खेर आणि पूजा रुपारेल (सिनेमात छुटकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री) यांनी कपिलच्या या शोमध्ये भरपूर धमालमस्ती केली. यावेळी या सर्व कलाकारांनी सिनेमाशी निगडीत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. इतकेच नाही तर या कलाकारांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनासुद्धा मनमोकळी उत्तरे दिली.
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'चा 'डीडीएलजे' स्पेशल एपिसोड डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रसारित केला जाणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'च्या मंचावर आलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...