आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Picture Perfect: Dimply Ganguly Makes For A Beaming Bong Bride For Second Time

राहुल महाजनच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने थाटला दुसरा संसार, चढली बोहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही पर्सनॅलिटी राहुल महाजनची पुर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुली 27 नोव्हेंबर रोजी बॉयफ्रेंड रोहित रॉयसोबत विवाहबद्ध झाली. बंगाली पद्धतीने डिंपी आणि रोहितचे लग्न झाले. कोलकाता येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा रंगला. या लग्नाची निवडक छायाचित्रे डिंपाच्या मैत्रिणीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.
लग्नसोहळ्याच्या आदल्या दिवशी डिंपीने बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत तिचे जवळचे मित्रमैत्रिणी सहभागी झाले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात डिंपी आणि रोहित एन्गेज्ड झाले. इंस्टाग्राम अकाउंटवर डिंपीने साखरपुड्याच्या अंगठीचा फोटो शेअर केला होता.
डिंपीचे हे दुसरे लग्न आहे. एका रिअॅलिटी शोमध्ये डिंपी राहुल महाजनसोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र 2013 मध्ये हे दोघे विभक्त झाले आणि फेब्रुवारी 2015 मध्ये दोघांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, डिंपी आणि रोहितच्या लग्नाची खास छायाचित्रे...