आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी डिंपीच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेवर बोलला पती, टिकाकारांना दिले सडेतोड उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नावेळी रोहित रॉय आणि डिंपी गांगुली - Divya Marathi
लग्नावेळी रोहित रॉय आणि डिंपी गांगुली
मुंबई: राहुल महाजनची पूर्वाश्रमीची पत्नी डिंपी गांगुलीने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे नाव रिआना ठेवण्यात आले आहे. डिंपी आणि रोहित यांच्याविषयी सोशल मीडियावर अशी माहिती फिरतेय, की डिंपी लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती. यामुळे डिंपीचा पती रोहितने टिकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. रोहितच्या सांगण्यानुसार, तिचे आणि डिंपीचे नाते प्रेम आणि विश्वासाने जोडले आहे. तसेच रोहितने सपोटर्स आणि वेल विशर्सचे आभारसुद्धा मानले आहे.
राहूलपासून विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांनी 27 डिसेंबर 2015ला डिंपीने दुबई बेस्ड बिझनेसमन रोहित रॉयसोबत लग्न केले.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झाले डिंपीचे दुसरे लग्न...
राहूल महाजनला घटस्फोट दिल्यानंतर डिंपीने मागील वर्षी 27 नोव्हेंबरला रोहितसोबत लग्न केले. हा लग्नसोहळा कोलकात्यात झाला. डिंपीने लग्नात पिंक कलरचा आऊटफिट परिधान केला होता.
'बिग बॉस 8'मध्ये दिसली होती डिंपी...
डिंपी गांगुली 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वात झळकली होती. या पर्वात तिचा पूर्वाश्रमीचा पती राहूल महाजनसुद्धा विशेष सीक्वेन्सवेळी आला होता. त्यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढलेली दिसली होती. 2010मध्ये लग्नगाठीत अडकल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2013मध्ये राहूल आणि डिंपी वेगळे झाले होते. त्याचवर्षी त्यांचा घटस्फोटही झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रोहित आणि डिंपीचे रोमँटिक Photos...
बातम्या आणखी आहेत...