(डिंपी आणि राहुलच्या लग्नाचे छायाचित्र)
राहुल महाजन आणि त्याची पत्नी डिंपी घटस्फोट घेणार असल्याची बातमी आहे. प्रत्येकजण त्यांच्या बिघडत चाललेल्या नात्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. मात्र आता
बिग बॉसच्या घरात त्यांच्या या नात्याचे रहस्य उघड होणार असे चित्र आहे. डिंपी बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डच्या माध्यमातून एन्ट्री घेणार आहे. तिने घरातील सदस्यांकडे
आपल्या आणि राहुलच्या नात्याविषयी मन मोकळे करण्याचे ठरवले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसचे निर्माते शोचा टीआरपी वाढवण्याच्या विचारात आहेत. त्यांची अशी इच्छा होती, की डिंपीने राहुल आणि तिच्या नात्यामध्ये निर्माण झालेल्या दुराव्याविषयी बिग बॉसच्या घरात सर्वकाही सांगावे. खरं तर डिंपीने त्यांचे सर्व म्हणणे कबूल केलेले नाही. मात्र घरातील सदस्यांनी याविषयी विचारणा केल्यास डिंपी त्यांच्याकडे आपले मन मोकळे करणार आहे.
डिंपी म्हणते, की कोणतीही योजना आखून मी घरात प्रवेश करत नाहीये. या शोची नियमित प्रेक्षक असल्यामुळे तिला घरातील कटकारस्थाने, मैत्री याविषयीची कल्पना आहे. घरातील सर्वांची आवडती होण्याचे तिने ठरवले आहे.
डिंपीची एन्ट्री आजच्या (7 नोव्हेंबर) एपिसोडमध्ये होणार आहे.