आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discovery New Show 'Naked And Afraid' Become Viral

PHOTOS: चक्क कपडे आणि खाण्याशिवाय स्पर्धक राहणार भयावह जंगलात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


डिस्कव्हरी चॅनलवर येत्या रविवारपासून एक नवीन आणि आगळा-वेगळा रिअ‍ॅलिटी शो सुरु होणार आहे. या आगळ्या वेगळ्या रिअ‍ॅलिटी शोचे नाव आहे 'नेक्ड अँड अफ्रेड'. या शोमध्ये स्पर्धकांना चक्क कपडे आणि खाण्याशिवाय 21 दिवस दुर्गम परिसरात काढावे लागणार आहेत.

या शोच्या नवीन सीरीजमध्ये दर आठवड्याला दोन स्पर्धकांना कपडे, पाणी आणि खाण्याशिवाय रिमोट एरियात पाठवण्यात येईल. एकमेकांसाठी अनोखळी असलेले हे दोन स्पर्धक येथे 21 दिवस एकत्र राहतील. अतिशय कठीण परिस्थितीत या स्पर्धकांना येथे राहावे लागले. शिवाय आपल्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतील.

21 दिवस हे स्पर्धक जंगलात कसे राहतात, हे टेलिव्हिजनवर दाखवण्यात येईल. हा शो सुरु होण्यापूर्वीच इंटरनेटवर ट्रेडिंग टॉपिक बनला आहे. या शोचा प्रीमिअर येत्या रविवारी रात्री 10.20 मिनिटांनी डिस्कव्हरी चॅनलवर होणार आहे.

'नेक्ड अँड अफ्रेड' या शोची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(सौजन्य - डिस्कव्हरी चॅनल)