आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disha Vakani Aka Daya Bhabhi To Get Married On 26 November

26 नोव्हेंबरला \'दया भाभी\'चे लग्न, बनणार मुंबईच्या बिझनेसमनची वधू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : दिशा वाकाणी
मुंबई- टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दया भाभी अर्थातच दिशा वाकाणी लग्न करणार आहे. बातम्यांनुसार दिशा (35 वर्षे) याच महिन्याच्या अखेरपर्यंत गुजराती बिझनेसमन मयूरसोबत अरेंज मॅरेज करणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार 'दया आणि मयूरचे लग्न 26 नोव्हेंबरला आहे. हा पूर्णत: खासगी समारंभ असणार आहे. विशेष म्हणजे, 'तारक मेहता...' टीमलासुध्दा या लग्नात आमंत्रित करण्यात आले नाहीये. निर्माता असित मोदीला आमंत्रण पाठवण्यात आले आहे आणि ते या लग्नात उपस्थित राहणार आहेत.'
फ्रेंड्स आणि नातेवाईकांना देणार रिसेप्शन-
लग्नानंतर दिशा रिसेप्शन प्लान करणार आहे. त्यामध्ये तिचे नातेवाईक आणि फ्रेंड्स दिसणार आहेत. विशेष म्हणजे, दिशाचा को-स्टारसुध्दा रिसेप्शनदरम्यान तिच्या रिअल लाइफ पतीला भेटणार आहे. दिशा खूपच प्रायव्हेट पर्सन आहे. तिला तिचे लग्न सार्वजनिक करायचे नाहीये. तिचे सासरचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीशी काहीही एक संबंध नाहीये. म्हणून त्यांनी दिशाच्या कुटुंबियांना विनंती केली आहे, की या लग्नापासून माध्यमांना दूर ठेवा.
भाऊ मयूर वाकाणीने कन्फर्म केली बातमी-
लग्नाची बातमीविषयी दिशाचा भाऊ मयूर वाकाणीने कन्फर्मेशन दिले आहे. मात्र त्याने याविषयी जास्त माहिती देण्यास नकार दिला आहे. त्याने सांगितले, की बातमी योग्य आहे आणि आम्ही सर्वजण मुंबईला जाऊन सर्व गोष्टी फायनल करणार आहोत. जेव्हा सर्वकाही फायनल होईल तेव्हा माध्यमांना याविषयी सांगितले जाईल.
दिशाला भेट म्हणून मिळाली ऑडी-
दिशाचे लग्न माध्यमांत चर्चेचा विषय झाला आहे. तसेच आणखी एक बातमी समोर आली आहे, की मयूरने (दिशाचा भावी पती) दिशाला एक ऑडी गिफ्ट दिली आहे. मात्र याविषयी कोणतीच पुष्टी झाली नाहीये.
दिशा वाकाणी लोक गरबा क्वीन म्हणून ओळखतात. छोट्या पडद्यावर दया भाभीचे संस्कार, डान्स आणि जेठालालसोबतची तिची मस्ती सर्वांनी डोक्यावर घेतली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी सांगत आहोत.
गुजरातमध्ये झाला जन्म-
1997पासून अभिनयाच्या जगात सक्रिय दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978ला अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. परंतु ती भावनगरमध्ये लहानची मोठी झाली. शाळेत शिक्षण घेत असतानाच दिशा अभिनयात सक्रिय आहे. तिने गुजरात कॉलेज, अहमदाबादमधून ड्रामेटिक आर्ट्समध्ये पदवी शिक्षण घेतले.
दिशाने सिनेमांतसुध्दा केले आहे काम-
दिशा वाकाणी केवळ टीव्ही मालिकाच नव्हे बॉलिवूड सिनेमांतसुध्दा झळकली आहे. तिने अनेक सिनेमांत काम केले आहे. 'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) आणि 'जोधा अकबर' (2008)मध्ये तिचा अभिनय दिसतो.
'तारक मेहता...'मधून मिळाली खरी ओळख-
दिशा 2008पासून सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. शिवाय 'खिचडी' (2004) आणि 'इंस्टेंट खिचडी' (2005) शोमध्येसुध्दा ती दिसली आहे. दिशाने आतापर्यंत 10पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दया भाभी अर्थातच दिशा वाकाणीच्या खासगी आयुष्यातील फोटो...