आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disha Vakani Aka Daya Bhabhi To Get Married On 26 November

विवाहबंधनात अडकली \'दयाबेन\', पाहा बालपणीपासून ते आतापर्यंतचे खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : दिशा वाकाणी
 
मुंबई- टीव्ही मालिका \'तारक मेहता का उल्टा चश्मा\' फेम दयाबेन अर्थातच दिशा वाकाणी लग्नगाठीत अडकली आहे. दिशा (37 वर्षे)ने 24 नोव्हेंबरला मुंबईच्या गुजराती बिझनेसमन मयूरसोबत अरेंज मॅरेज केले आहे. हा लग्नसोहळा खासगी होता. इतकेच नव्हे तर \'तारक मेहता...\'ची टीमसुध्दा या लग्नात उपस्थित नव्हती. मात्र, निर्माता असित मोदीला लग्नाचे आमंत्रण पाठवले होते. 
 
फ्रेंड्स आणि नातेवाईकांना देणार रिसेप्शन- 
लग्नानंतर दिशा 26 नोव्हेंबरला रिसेप्शन देण्याचे प्लानिंग करत आहे. त्यामध्ये नातेवाईक आणि फ्रेंड्स दिसतील. विशेष म्हणजे, दिशाचे को-स्टार्ससुध्दा या रिसेप्शनमध्ये तिच्या रिअल लाइफ पार्टनरला भेटणार आहेत. दिशा खूपच प्रायव्हेट पर्सन आहे आणि तिला या लग्नात कोणतेच मीडिया अटेंशन नको होते. तिच्या सासरचा टेलिव्हिजन इंडस्ट्रीची काहीएक संबंध नाहीये. त्यामुळे त्यांनी दिशाच्या कुटुंबीयांना हे लग्न मीडियापासून दूर ठेवण्याची विनंती केली.
दिशा वाकाणी लोक गरबा क्वीन म्हणून ओळखतात. छोट्या पडद्यावर दया भाभीचे संस्कार, डान्स आणि जेठालालसोबतची तिची मस्ती सर्वांनी डोक्यावर घेतली आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी सांगत आहोत.
 
गुजरातमध्ये झाला जन्म- 
1997पासून अभिनयाच्या जगात सक्रिय दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978ला अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. परंतु ती भावनगरमध्ये लहानची मोठी झाली. शाळेत शिक्षण घेत असतानाच दिशा अभिनयात सक्रिय आहे. तिने गुजरात कॉलेज, अहमदाबादमधून ड्रामेटिक आर्ट्समध्ये पदवी शिक्षण घेतले.
 
दिशाने सिनेमांतसुध्दा केले आहे काम- 
दिशा वाकाणी केवळ टीव्ही मालिकाच नव्हे बॉलिवूड सिनेमांतसुध्दा झळकली आहे. तिने अनेक सिनेमांत काम केले आहे. \'कमसिन : द अनटच्ड\' (1997), \'फूल और आग\' (1999), \'देवदास\' (2002), \'मंगल पांडे : द राइजिंग\' (2005), \'सी कंपनी\' (2008) आणि \'जोधा अकबर\' (2008)मध्ये तिचा अभिनय दिसतो.
 
\'तारक मेहता...\'मधून मिळाली खरी ओळख- 
दिशा 2008पासून सब टीव्हीच्या \'तारक मेहता का उल्टा चश्मा\' मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. शिवाय \'खिचडी\' (2004) आणि \'इंस्टेंट खिचडी\' (2005) शोमध्येसुध्दा ती दिसली आहे. दिशाने आतापर्यंत 10पेक्षा जास्त टेली अवॉर्ड्स जिंकले आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दया भाभी अर्थातच दिशा वाकाणीच्या खासगी आयुष्यातील काही फोटो...