आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दयाभाभी'च्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, बघा लग्नापासून रिसेप्शनपर्यंतचे 15 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत दया भाभीची भूमिक साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणी हिने नुकताच तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. 24 नोव्हेंबर 2015 रोजी मुंबई बेस्ड चार्टर्ड अकाउंटंट मयूर परीहासोबत दिशाचे लग्न झाले होते. हा लग्नसोहळा अतिशय खासगी होता. लग्नात केवळ कुटुंबीय आणि जवळची मित्रमंडळी सहभागी झाली होती.
दोन दिवसानंतर झाले होते रिसेप्शन...
लग्नाच्या दोन दिवसांनंतर दिशाने मुंबईतील तिच्या फ्रेंड्ससाठी रिसेप्शन ठेवले होते. यावेळी 'तारक मेहता...'ची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. बाबूजी चंपकलाल गडा (अमित भट) पत्नीसोबत येथे पोहोचले होते. तारक मेहता (शैलेष लोढा), माधवी भि़डे (सोनालिका जोशी), सोनू (निधी भानुशाली), रोशन सिंह सोढी (गुरुचरण सिंह) आणि पत्रकार पोपटलाल (श्याम पाठक) सह सर्व कलाकार त्यांच्या कुटुंबीयांसोबत दिशाला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
पुढील स्लाईड्समध्ये बघा दिशा वाकाणीचा वेडिंग अल्बम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...