आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: \'तारक मेहता...\'च्या \'दयाबेन\'चे हे रुप नक्कीच यापूर्वी कधी पाहिले नसावे तुम्ही!!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री दिशा वाकाणी पुढचे काही दिवस आता या मालिकेत दिसणार नाहीये. दिशाने 17 सप्टेंबरपर्यंतच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण करुन आता काही महिन्यांसाठी  शूटिंगपासून सुटी घेतली आहे. त्याचे कारण म्हणजे दिशा गर्भवती असून लवकरच ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. अलीकडेच मुंबईतील पवई येथील सासरच्या घरी दिशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तील तिच्या सहकलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे नक्कीच येणा-या एपिसोड्समध्ये प्रेक्षक त्यांच्या लाडक्या दयाबेनला मिस करणार हे काही वेगळे सांगायला नको. 
 
दिशाने या मालिकेपूर्वी अनेक गुजराती नाटकांमध्ये अभिनय केला. जाणून घेऊयात दिशाच्या खासगी आयुष्याविषयी आणि बघा तिची जुनी छायाचित्रे. मालिकेत नेहमी साडीत दिसणारी दिशा खासगी आयुष्यात मात्र वेस्टर्न आउटफिटलासुद्धा पंसती देताना दिसते.   
 
मुळची गुजरातची आहे दिशा... 
39 वर्षीय दिशाचा जन्म 17 सप्टेंबर 1978 रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. परंतु भावनगरमध्ये तिचे बालपणा गेले. बालपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. शालेय शिक्षण घेत असतानाच दिशाला अभिनयाचे वेड लागले. तिने गुजरात कॉलेज, अहमदाबादमधून ड्रामॅटिक आर्ट्समध्ये पदवी घेतली. दिशाल खरी ओळख 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून मिळाली. परंतु त्यापूर्वी तिने गुजरातच्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकांमध्ये ‘देवराणी-जेठानी’, ‘चाल चंदू परणी जोइए’, ‘लाली-लीला’, ‘अषाढ का एक दिन’, ‘बा रिटायर’, ‘खरा छो तमे’, ‘अलग छता लगोलग’ आणि ‘सो दाहडा सासू’ या मालिकांचा उल्लेख होतो. हिंदा मालिकांविषयी बोलायचे झाले तर 'तारक मेहता...'शिवाय ती 'खिचडी' (2004) आणि 'इंस्टेंट खिचडी' (2005) या मालिकांमध्ये झळकली. या दोन्ही शोमध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होती. दिशाने आतापर्यंत 10 हून अधिक टेली अवॉर्ड्स आपल्या नावी केले आहेत. 
 
भाऊ-बहीण आणि वडीलसुध्दा अभिनय क्षेत्रात कार्यरत...
दिशाचे वडील भीम वाकाणीसुध्दा आपल्या काळात अभिनयात सक्रिय होते. आता ते काही गुजराती मालिका आणि सिनेमांत काम करतात. आता ते अहमदाबादमध्ये 'वाकाणी थिएटर्स'च्या बॅनरखाली गुजराती नाटकांची निर्मिती करतात. भीम वाकाणी यांनी तयार केलेल्या अनेक मालिकांमध्ये दिशाचा भाऊ मयूर आणि मोठी बहीण खुशालीने काम केले आहे. दिशाचा भाऊ मयूरने स्कल्पचरचा कोर्स पूर्ण केला असून त्याचे नाव गुजरातच्या प्रसिध्द शिल्पकारांमध्ये घेतले जाते. शिवाय त्याला अभिनयाचीही आवड आहे.  तो अनेक गुजराती मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसला आहे. तसेच दिशाची थोरली बहीण खुशाली गुजराती थिएटर्सचा प्रसिध्द चेहरा आहे. दिशाचा भाऊ मयूर वाकाणीचे लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुलेसुध्दा आहे. मयूरच्या पत्नीचे नाव हेमाली आहे. मयूर 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दया भाभीचा (दिशा वाकाणी) भाऊ सुंदरलालचे पात्र साकारत आहे.
 
दिशाने सिनेमांतसुध्दा केले आहे काम...
दिशा वाकाणी केवळ टीव्ही मालिकाच नव्हे बॉलिवूड सिनेमांतसुध्दा झळकली आहे. तिने अनेक सिनेमांत काम केले आहे. 'कमसिन : द अनटच्ड' (1997), 'फूल और आग' (1999), 'देवदास' (2002), 'मंगल पांडे : द राइजिंग' (2005), 'सी कंपनी' (2008) आणि 'जोधा अकबर' (2008)मध्ये ती झळकली आहे. 

'तारक मेहता...'मधून मिळाली खरी ओळख... 
दिशा 2008पासून सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून दिशाला लोकप्रियता मिळाली. याचवर्षी 28 जुलै रोजी या मालिकेने नऊ वर्षे पूर्ण केली आहेत. आतापर्यंत या मालिकेचे दोन हजारांहून अधिक एपिसोड्स प्रसारित झाले आहेत. 

पुढील स्लाईड्सवर बघा, दिशाचे यापूर्वी कधीही न पाहिलेले PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...