आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disha Vakani\'s Husband And Brother Share The Same Name

एकच आहे \'दया भाभी\'च्या भावाचे आणि भावी नव-याचे नाव, यावर्षी अडकणार लग्नगाठीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः भाऊ मयूर वाकाणीसोबत दिशा वाकाणी)
मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या गाजत असलेल्या मालिकेत दया भाभी हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणी लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याची बातमी अलीकडेच मीडियात आली आहे. आता तिच्या होणा-या भावी पतीचे नावही उघड झाले आहे. असे म्हटले जाते, की मुंबई बेस्ड गुजराती बिझनेसमन मयूरसोबत दिशा लग्नगाठीत अडकणारेय. मयूर यांचे संपूर्ण नाव उघड झालेले नाही, मात्र ते मुंबईत पवई परिसरात वास्तव्याला असल्याचे समजते.
दिशाच्या भावाचे नावसुद्धा आहे मयूर..
दिशाच्या भावी नव-याचे नाव मयूर आहे. विशेष म्हणजे तिच्या भावाचे नावाही मयूर आहे. मयूर वाकणीसुद्धा दिशासोबत 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत काम करत असून त्यांनी दया भाभीच्या भावाची भूमिका साकारली आहे. जो अहमदाबादमध्ये राहतो आणि खास निमित्ताने दया भाभीला भेटायला गोकुळधाम सोसायटीत येत असतो.
वर्षाअखेरपर्यंत होणार लग्न...
बातम्यांनुसार, दिशा आणि मयूर यांचे अरेंज मॅरेज आहे. मयूर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच दिशा आणि मयूर यांचा साखरपुडा होणार असून वर्षाअखेरपर्यंत दोघे विवाहबंधनात अडकतील.
दिशाच्या भावी वराची छायाचित्रे अद्याप मीडियात आलेली नाहीत. मात्र तिच्या भावाची मयूरची छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...