आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांका-विवेकने केले Royal Pre-Wedding फोटोशूट, शेअर केला फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका-विवेकचे रॉयल प्री-वेडिंग फोटोशूट - Divya Marathi
दिव्यांका-विवेकचे रॉयल प्री-वेडिंग फोटोशूट
मुंबई: टीव्हीची 'इशिता' अर्थातच दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता बॉयफ्रेंड विवेक दाहियाचे लग्न जसजसे जवळ येत आहे, दोघांचा उत्साह वाढताना दिसतोय. अलीकडेच दिव्यांका आणि विवेकने वेडिंग स्टोरीसाठी प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. त्यात दिव्यांका बेबी पिंक व्हाइट फ्लोई गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती. तसेच विवेकने डार्क प्रशिअन ब्लू सुट परिधान केलेला होता. विवेकने इंस्टाग्रामवर प्री-वेडिंग फोटोशूटचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्यात दिव्यांका आणि विवेक दोघेही एखाद्या रॉयल कपलसारखे दिसत आहेत. विवेकने गोल्डन शेरवानी आणि दिव्यांकाने रॉयल साडी नेसली आहे.
विवेकच्या घरी झाली शगुन सेरेमनी...
अलीकडेच विवेकच्या घरी झालेल्या प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये शगुनचा कार्यक्रम झाला होता. शगुनमध्ये दिव्यांकाला चुडा, ईअररिंग्स, लाल ओढणी आणि सुहारचे सर्व सामान मिळाले. दिव्यांका आणि विवेकचे लग्न 8 जुलैला होणार आहे. दिव्यांकाच्या होमटाऊन भोपाळमध्ये लग्नाच्या तयारी सुरु झाल्या आहेत. वेडिंग ड्रेसपासून फंक्शनच्या होस्टिंगपर्यंत सर्व गोष्टी ठरल्या आहेत.
'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली भेट...
- दिव्यांका आणि विवेक यांची भेट टीव्ही शो 'ये है मोहब्बते' मालिकेच्या सेटवर झाली.
- 6 महिने डेट केल्यानंतर दोघांनी 17 जानेवारीला साखरपुडा केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका आणि विवेकचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...