आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदीगढमध्ये झाले दिव्यांका-विवेकच्या लग्नाचे रिसेप्शन, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगढमध्ये दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाचे रिसेप्शन झाले. - Divya Marathi
चंदीगढमध्ये दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाचे रिसेप्शन झाले.
चंदीगढ: रविवारी (10 जुलै) अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी पती विवेक दहियासोबत सासरचंदीगढला पोहोचली. येथे रात्री उशीरा त्यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यादरम्यान दिव्यांका मेहरून आणि गोल्डन लहंग्यात खूपच सुंदर दिसली. विवेकसुध्दा डार्क ब्लू कोटमध्ये हँडसम दिसत होता.
कुठे होणार दुसरे रिसेप्शन...
- पहिले रिसेप्शन चंदीगढमध्ये झाल्यानंतर दुसरे रिसेप्शन 14 जुलैला मुंबईमध्ये होणार आहे.
- या रिसेप्शन पार्टीत दोघांचा मित्र परिवार आणि कलीग्स सामील होणार आहेत.
- विवेक-दिव्यांका 8 जुलैला भोपाळमध्ये लग्नगाठीत अडकले.
यांनी डिझाइन केला दिव्यांकाचा लहंगा आणि वेडिंग गाऊन...
- मुंबईचे डिझाइनर निलेश अर्थातच एनजेने दिव्यांकाचा वेडिंग आऊटफिट तयार केला.
- एनजे फॅनश इंडस्ट्रीमध्ये मागील 10 वर्षांपासून काम करत आहे. सध्या तो कल्किसारख्या मोठ्या ब्रँडसाठी काम करतोय.
मिस्टर चंदीगढ होता विवेक दहिया...
- चंदीगढमध्ये जन्मलेला विवेक 'ये है आशिकी' आणि 'एक वीर की अरदास वीरा'सारख्या मालिकांमध्ये झळकला आहे.
- सध्या तो दिव्यांकासोबत 'ये है मोहब्बते' मालिकेत एसीपी अभिषेकचे पात्र साकारत आहे.
- विवेकचे बालपण चंदीगढमध्येच गेले. त्याचे वडील वकील तर आई हाऊसवाइफ आहे. एक थोरली बहिणसुध्दा आहे.
- विवेकने इंग्लंडच्या डी मॉन्टफोर्ट यूनिव्हर्सिटीमधू एमएससीमध्ये पदवी शिक्षण घेतले आहे. त्याने चंदीगढमध्ये येऊन मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.
- 2011मध्ये मिस्टर चंदीगढचे टायटल जिंकल्यानंतर तो मुंबईला गेला आणि अभिनयात करिअर केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका-विवेकच्या चंदीगढमधील रिसेप्शनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...