आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुटिंगवरुन परतलेल्या दिव्यांकाच्या पतीचा खुलासा, विदेशात आम्हाला भेदभावाची वागणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका आणि विवेक. - Divya Marathi
दिव्यांका आणि विवेक.

मुंबई - टीव्ही शो 'ये है मोहब्बते' ची स्टारकास्ट नुकतीच बुडापेस्ट येथे आऊटडोअर शुटिंगवरुन परतली आहे. तेथून परतल्यानंतर दिव्यांकाच पती विवेक दहियाने सांगितले की बुडापेस्ट एअरपोर्टवर त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. एवढेच नाही तर एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत वर्णद्वेषी वर्तन केले. विवेकने सांगितल्यानुसार, 'मी आणि दिव्यांका बोर्डिंगसाठी वेट करत होतो, मात्र अधिकाऱ्यांनी आमच्याऐवजी अमेरिकन्सला प्रियारिटी दिली.'

 

आणखी काय म्हणाला विवेक...

- विवेक म्हणाला, मी 18 वर्षांचा होतो, तेव्हापासून ट्रॅव्हलिंग करतो. एवढेच नाही तर 7 वर्षे यूकेमध्ये राहून शिक्षण घेतले आहे. मात्र अशी वाईट वागणूक कुठेही मिळाली नाही. बुडापेस्ट हे पहिले शहर आहे जिथे मला वर्णद्वेषी वागणूकीचा सामना करावा लागला.  
- विवेकने सांगितले, की बुडापेस्टमध्ये आम्हाला सुरुवातीपासून हा अनुभव येत होता. मात्र त्याकडे आम्ही फार गांभीर्याने पाहिले नाही. मात्र नंतर लक्षात येत गेले की परकियांबद्दल त्यांची वागणूक भेदभावपूर्ण आहे. 
- आपल्या देशात मात्र यापेक्षा उलट आहे. येथे स्वदेशातील लोकांपेक्षा विदेशी लोकांना प्रियारिटी दिली जाते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बुडापेस्टमध्ये 'ये है मोहब्बते'च्या स्टारकास्टने असे केले एंजॉय

बातम्या आणखी आहेत...