आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'ये है मोहबत्तें\'चे दिव्यांका-करण झाले \'ऑसी-वेडे\', जाणून घ्या काय आहे ही भानगड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'ये है मोहब्बते' या मालिकेतील इशिता अय्यर आणि रमण भल्ला अर्थातच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल हे दोघेही ऑसी वेडे झाले आहेत. झालं असं, की अलीकडेच हे दोघेही मालिकेच्या टीमसोबत शूटिंगसाठी दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या टूरवर गेले होते. येथील अॅडुलेड या स्थळी मालिकेचे चित्रीकरण झाले. अॅडुलेड इथून परतताना हे दोघेही अतिशय भारावून गेले होते.

याविषयी दिव्यांका सांगते, "ही माझी पहिलीच ऑस्ट्रेलियावारी होती आणि हे खूपच सुंदर स्थळ आहे. अॅडुलेड या शहरात योग्य नियोजन केलेले आणि उत्कृष्ट निगा राखली गेली आहे. इथली प्रत्येक जागा सामान्य माणसाची, विशेषतः कामगार आणि सायकल चालवणा-यांची सोय होईल, हे ध्यानात घेऊन वसवण्यात आली आहे. मुंबईत या प्रकारचे सायकल चालवण्याचे मार्ग असते तर मी प्रवासासाठी माझी गाडी वापरली नसती. शहरात निव्वळ पायी फेरी मारणंही किती छान आनंद देणारे आहे तिथे."

तर अभिनेता करण पटेलचाही दक्षिण ऑस्ट्रेलियाचा अनुभव फारच अप्रतिम होता. "तिथले वातावरण अतिशय छान आहे. आम्ही कांगारु बेटावर गेलो होतो. तिथे कांगारु आणि कोआला यांना आम्ही हाताने खाऊ घातले. हा अनुभव आणि ही स्थळं अगदी अवर्णनीय आहेत. तिथले रिमार्केबल रॉक्स तर काळजाचा ठोका चुकवतात. या ठिकाणांवर स्वतःला फोटो काढण्यापासून थांबवणे जरा कठीणच आहे. कॅमे-यात कैद झालेली प्रत्येक फ्रेम अप्रतिम असते आणि मग आपल्याला वाटतं, सगळे काही कॅमे-यात बंदिस्त करावे. हँडली स्ट्रीटवरील नाइटलाइफ आणि जेवणही मस्तच. मला अगदी मनापासून वाटतं, की ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येक वयोगटासाठी काही ना काही आहे."

या मालिकेतील कलाकार 10 दिवस अॅडुलेडमध्ये होते आणि या काळात त्यांनी शहराची ओळख करुन घेत भरपूर मजा केली. शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले रुंडल स्ट्रीट मॉले, हार्बर टाऊन, अॅडुलेड झू आणि अॅडुलेड ओव्हल या ठिकाणांना त्यांनी भेट दिली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, या कलाकारांचे ऑस्ट्रेलिया टूरचे खास PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...