आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1260 स्वे. फुट आहे दिव्यांकाचे नवे आलिशान घर, बघा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'ये हैं मोहब्बते' या मालिकेतील इशिता अर्थातच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी याचवर्षी 8 जुलैला अभिनेता विवेक दहियासोबत लग्नगाठीत अडकली. लग्नानंतर दिव्यांका विवेकसोबत मुंबईतील गोरेगाव येथे स्थायिक झाली आहे. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच दिव्यांका आणि विवेकने गोरेगाव येथे एक थ्री बीएचके घर खरेदी केले. या दोघांचे हे घर अतिशय सुंदर आहे.

गोरेगांवमध्ये खरेदी केले 1260 स्क्वेअर फुट घर...
दिव्यांकाने लग्नानंतर मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गोरेगांवमध्ये 1260 स्क्वेअर फुटचे एक घर खरेदी केले आहे. दिव्यांकाने सांगितले, की गोल्डन अॅम्बिएन्स असलेल्या या मॉर्डन घराचे इंटीरिअर खूप सुंदर आहे. शिवाय घरात ट्रॉफी ठेवण्यासाठीसुध्दा जागा आहे.

घराच्या भिंतीवर गोल्डन पेंट...
दिव्यांकाच्या नवीन आशियानाच्या भिंतीवर गोल्डन कलरचे पेंट केले आहे. शिवाय घराचे फर्निचरसुध्दा लग्झरी फिलिंग देते. भिंतीवर केलेले वॉल पेंटींग घराच्या सौंदर्यात भर टाकते. इतकेच नव्हे तर सीलिंगसुध्दा खूप सुंदर आहे. शिवाय घरात प्रकाश येण्यासाठी उत्तम सोय केली आहे.

घरात बनलेल्या मंदिरात सिल्वर कोरीव काम...
घरात एका कोप-यात मंदिर बनवण्यात आले आहे. त्यावर सिल्वर कोरीव काम केले आहे. हे मंदिर जयपूरमधून खरेदी केलेले आहे. येथेच दिव्यांकाचे मेडिटेशन कॉर्नरसुध्दा असेल.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आतून कसे दिसते दिव्यांकाचे नवीन घर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...