आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या \'दुल्हन\'ने केला को-अॅक्टरसोबत साखरपुडा, सोशल मीडियावर आले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवेक दाहिया आणि दिव्यांका त्रिपाठी साखरपुड्यादरम्यान - Divya Marathi
विवेक दाहिया आणि दिव्यांका त्रिपाठी साखरपुड्यादरम्यान
मुंबई- टीव्हीवर 'दुल्हन' आणि 'इशिता' नावाचे लोकप्रिय झालेली दिव्यांका त्रिपाठीने को-अॅक्टर विवेक दाहियासोबत साखरपुडा केला आहे. तिच्या एका फॅनने सोशल साइटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'दिव्यांकाच्या पालकांनी विवेकला पसंत केले. त्यांच्या म्हणण्यावरून दोघांनी साखरपुडा उरकला.' दिव्यांका आणि विवेक जवळपास 6 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
डिसेंबरमध्ये आली होती लग्नाच्या प्लानिंगची बातमी...
डिसेंबर 2015मध्ये बातमी आली होती, की दिव्यांका विवेकसोबत लग्नाचे प्लानिंग करत आहे. विवेक दिव्यांकासोबत 'ये है मोहब्बते' मालिकेत एसीपी अभिषेकची भूमिका साकारत आहे. शूटिंगदरम्यान त्यांची जवळीक वाढली. मात्र त्यांनी कधीच अफेअरच्या बातम्या स्वीकारल्या नाहीत.
काय म्हणते दिव्यांका?
2015च्या अखेर इंडियन टेली अवॉर्ड्स सेरेमनीदरम्यान दिव्यांकाला अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली होती, 'मी माझ्या रिलेशनशिपविषयी अद्याप काहीच सांगू शकत नाही. सेटवरून अशा अफवा कोण पसरवत आहेत, जाणून घेण्याची गरज आहे.'
मागील वर्षी संपुष्टात आले 7 वर्षे जूने नाते...
दिव्यांका त्रिपाठी आणि 'महाराणा प्रताप' फेम शरद मल्होत्रा यांचे 2015मध्ये ब्रेकअप झाले. दोघे जवळपास 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दिव्यांका आणि शरदची जवळीक ' बनू मै तेरी दुल्हन' मालिकेदरम्यान वाढली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका आणि विवेक यांच्या साखरपुड्याचे PHOTOS...