भोपाळ: टीव्ही अभिनेत्री दिव्यांकाचे 8 जुलैला लग्न आहे. 6 जुलैला तिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. हळदीच्या विधींवेळी दिव्यांकाने जो ड्रेस परिधान केला होता, तो तिच्या आईने एका दिवसात तयार केला आहे.
अशा पार पडताय दिव्यांकाच्या लग्नाच्या विधी...
- 'ये है मोहब्बते' मालिकेत इशिता अर्थातच टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 8 जुलैला को-स्टार विवेक दाहियासोबत सप्तपदी घेणार आहे.
- 6 जुलैला दिव्यांकाच्या हळदीची सेरेमनी भोपाळमध्ये तिच्या घरी झाली. या सेरेमनीमध्ये फॅमिली मेंबर्स, नातेवाईक आणि जवळचे फ्रेंड्स सामील झाले.
- भोपाळची मुलगी आणि टीव्ही इंडस्ट्रीची आवडती 'दुल्हन' दिव्यांकाची हळदीचा सोहळासुध्दा खास होता.
- पिवळा डिझाइनर लहंगा दिव्यांकाच्या सौंदर्यात चार चांद लावत होता.
एका रात्रीत तयार केला लहंगा...
- दिव्यांकाच्या या डिझाइनर लहंगाचे वैशिष्ट होते, की या स्पेशल फंक्शनसाठी दिव्यांकाची आई नीलम यांनी त्यांच्या हाताने हा लहंगा तयार केला होता.
- हा लहंगा आई आणि मुलीच्या नात्याचे प्रतीक होता.
- दोघींना एकमेकिंच्या आवडी-निवडी सर्वकाही ठाऊक आहे.
- जवळच्या एका सूत्राच्या सांगण्यानुसार, हा लहंगा फंक्शनच्या काही दिवसांपूर्वी आई नीलम यानी एका रात्री बसून तयार केला.
वाईट नजरेतून वाचण्यासाठी पिवळ्या रंगाचा लहंगा...
- लहंग्याच्या डिझाइनपासून फायनल टचपर्यंत आई नीलम यांनी दिव्यांकासोबत चर्चा केली. भारतीय परंपरेनुसार, लग्नात हळदीचा कार्यक्रम खूप महत्वपूर्ण मानला जातो.
- हळद वधू आणि वराला वाईट नजरेपासून दूर ठेवते.
- हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर वधू आणि वर घरातून बाहेर पडत नाहीत.
- म्हणजेच, आपल्या मुलीला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून आई नीलम यांनी दिव्यांकासाठी हळदीच्या रंगाचा ड्रेस डिझाइन केला.
- बालपणी शाळेच्या फंक्शनपासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिव्यांकाचे सर्व ड्रेस तिच्या आईनेच डिझाइन केले आहेत.
- सिने स्टार की खोजच्या ऑडिशन असो अथवा मुंबईमध्ये एखादा अवॉर्ड फंक्शन.
- दिव्यांकासुध्दा आईने तयार केलेला ड्रेस प्रेमाने परिधान करते.
150 पाहूण्यांची यादी झाली फायनल...
- या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि फ्रेंड्स मिळून भोपाळमध्ये जवळपास 150 लोक सामील आहेत.
- लग्नाच्या संगीत, मेंदी आणि सप्तपदीच्या विधी भोपाळमध्येच होणार आहेत.
- दिव्यांका आणि विवेक 8 जुलैला भोपाळमध्ये कान्हा फन सिटीमध्ये लग्नगाठीत अडकणार आहेत. 10 जुलैला होमटाऊन चंदीगढमध्ये रिसेप्शन होईल.
- शेवटी मुंबईत एक भव्य पार्टी आयोजित केली जाईल. त्याची तारिख अद्याप ठरलेली नाहीये.
'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली भेट...
- दिव्यांका आणि विवेकची भेट 'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली.
- विवेक शोमध्ये एसीपी अभिषेकचे पात्र साकारत असून दिव्यांका इशिताच्या भूमिकेत आहे.
- 6 महिने डेटींग केल्यानंतर दोघांनी 17 जानेवारीला साखरपुडा केला.
- विवेक चंदीगढच्या जाट फॅमिलीतून आहे. त्याने यूकेमधून शिक्षण घेतले असून ग्लॅमर इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांकाच्या हळदीच्या कार्यक्रमाचे Exclusive PHOTOS...