आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यांकाच्या हातावर रचली मेंदी, बघा पिंक कलरच्या डिझायनर ड्रेसमध्ये किती सुंदर दिसली नवरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 8 जुलै रोजी बोहल्यावर चढत आहे. भोपाळ येथे तिचा लग्नसोहळा होणारेय. 6 जुलैपासून तिच्या घरी लग्न विधींना सुरुवात झाली आहे. हळदीनंतर दिव्यांकाच्या हातावर मेंदी रचली. विशेष म्हणजे दिव्यांकाच्या हातावर तिचा आणि तिचा भावी नवरा विवेकचा चेहरा रेखाटण्यात आला आहे.

'ये हैं मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर दिव्यांका तिचा को-स्टार विवेक दाहियाच्या प्रेमात पडली. सहा महिने डेटिंग केल्यानंतर याचवर्षी 17 जानेवारीला दोघांचा साखरपुडा झाला होता. हळदीच्या कार्यक्रमात दिव्यांकाने तिच्या आईने स्वतः तयार केलेला पिवळ्या रंगाचा लहेंगा परिधान केला होता. हळदीनंतर मेंदीचा कार्यक्रम झाला. यावेळी दिव्यांकाने पिंक कलरचा सुंदरसा डिझायनर गाऊन घातला होता. दिव्यांका या अटायरमध्ये खूप सुंदर दिसली.

पाहुयात, दिव्यांकाच्या मेंदी सेरेमनीचे डोळे दिपवणारे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...