मुंबई - टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 'ये हे मोहोब्बते' मालिकेमुळे घराघरात पोहोचली आहे. दिव्यांका आणि विवेक हे दोघेही त्यांच्या सुपर जोडीमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच दिव्यांकाने लग्नानंतर प्रथमच तिचे बेडरुम सिक्रेट्स शेअर केले आहेत. विशेष म्हणजे दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे.
दिव्यांकाने नुकतेच तिचे बेडरुम सिक्रेट्स शेअर केले आहेत. वाचा, काय म्हटली दिव्यांका..
बेडच्या कोणत्या साईडवर झोपायला आवडते?
- तिला विवेकच्या डाव्या बाजुला झोपायला आवडते.
सकाळी दोघांपैकी बेड टी कोण बनवते?
- दिव्यांकाने सांगितले ती सकाळी चहा पित नाही. विवेकला रात्री चहा प्यायला आवडते. जर विवेकला चहा प्यायची इच्छा झाली तर तो स्वतः चहा बनवतो.
ब्लँकेटसाठी दोघांमध्ये भांडण होते का?
- नाही. जरी एक ब्लँकेट वापरत असलो तरी एक ब्लँकेट एक्सट्रा नेहमीच ठेवलेली असते. त्यामुळे त्यावरुन कधी भांडण होत नाही.
मीठीत घ्यायला की किस करायला, यापैकी काय आवडते?
- मला मीठीत झोपायला जास्त आवडते.
तुला पायजमा घालायला आवडते की सेक्सी नाईटी घालायला आवडते?
- दिव्यांकाने सांगितले की तिला, सिल्कच्या नाईटी अजिबात आवडत नाही. त्यामुळे शांतपणे झोप लागत नाही.
झोपताना लाईट बंद असतो की चालु ?
- ते दोघांच्या मुडवर असते, पण बहुतेकदा लाईट बंद असतो.
रोमान्सला दोघांपैकी कोण सुरुवात करतो?
- (हसत) याचे उत्तर मी देणार नाही.
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिव्यांका आणि विवेकचे खास फोटोज्..