आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसात झाले दिव्यांका-विवेकचे लग्न, चंदीगढमध्ये होणार रिसेप्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाच्या लग्नाचे Exclusive फोटो - Divya Marathi
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाच्या लग्नाचे Exclusive फोटो
भोपाळ: टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने शुक्रवारी (8 जुलै) विवेक दहियासोबत लग्नगाठ बांधली. तिच्या होमटाऊन भोपाळमध्ये पावसात दोघांचे लग्न झाले. भोपाळमधील या तरुणीने टीव्ही इंडस्ट्रीत चांगलीच ओळख निर्माण केली आहे. divyamarathi.com तुम्हाला दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाचे Exclusive फोटो दाखवणार आहे.
असे झाले लग्न...
- दिव्यांकाची वरात शुक्रवारी रात्री 11 वाजता फन सिटीमध्ये पोहोचली.
- पावसाची शक्यता पाहून संपूर्ण कार्यक्रम हॉलमध्ये ठेवण्यात आला होता.
- लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नये म्हणून मोबाईलने फोटो काढण्यावर बंदी होती.
- हॉलमध्ये असलेल्या आमच्या सूत्रांनी सांगितले, की शनिवारी (9 जुलै) सकाळी 4 वाजेपर्यंत दिव्यांकाने विवेकसोबत सप्तपदी घेतल्या.
- लग्नात केवळ मुंबईहून 'ये है मोहब्बते'ची टीम सामील झाली होती.
- 15 जुलैला दोघे मुंबईमधील नवीन घरी शिफ्ट होणार आहेत. तसेच टीव्ही इंडस्ट्रीतील लोकांना पार्टी देणार आहेत.
फॅमिली मेंबर्स, नातेवाईक, जवळचे मित्र झाले सामील...
- 6 जुलैला दिव्यांकाच्या हळदीचा कार्यक्रम भोपाळमध्ये तिच्या घरी झाला. या सेरेमनीमध्ये कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र परिवार सामील झाले होते.
- भोपाळची मुलगी आणि टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय दुल्हन दिव्यांकाचा हळदीचा कार्यक्रमसुद्धा खूप खास होता.
150 पाहूण्यांची यादी होती फायनल...
- या लग्नात कुटुंबीय, नातेवाईक आणि फ्रेंड्स मिळून भोपाळमध्ये जवळपास 150 लोक सामील झाले.
- लग्नाच्या संगीत, मेंदी आणि सप्तपदीच्या विधी भोपाळमध्येच झाल्या.
- दिव्यांका आणि विवेक 8 जुलैला भोपाळमध्ये कान्हा फन सिटीमध्ये लग्नगाठीत अडकले आहेत. 10 जुलैला होमटाऊन चंदीगढमध्ये रिसेप्शन देणार आहेत.
'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली भेट...
- दिव्यांका आणि विवेकची भेट 'ये है मोहब्बते'च्या सेटवर झाली.
- विवेक शोमध्ये एसीपी अभिषेकचे पात्र साकारत असून दिव्यांका इशिताच्या भूमिकेत आहे.
- 6 महिने डेटींग केल्यानंतर दोघांनी 17 जानेवारीला साखरपुडा केला.
- विवेक चंदीगढच्या जाट फॅमिलीतून आहे. त्याने यूकेमधून शिक्षण घेतले असून ग्लॅमर इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिव्यांका-विवेकच्या लग्नाचे Exclusive फोटो...
फोटो : अजीत रेडेकर
बातम्या आणखी आहेत...