आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyanka Tripathi\'s Ex Ssharad Malhotraa Dating Rachna Parulkar!

दिव्यांकासोबत ब्रेकअपनंतर आता या तरुणीला डेट करतोय टीव्हीवरील \'महाराणा प्रताप\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फाइल फोटो : दिव्यांका त्रिपाठी (डावीकडे) आणि रचना पारुलकरसोबत शरद मल्होत्रा]
मुंबईः अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'महाराणा प्रताप'मध्ये लीड रोल साकारणारा अभिनेता शरद मल्होत्रा याकाळात त्याची को-अॅक्ट्रेस अजबेदा उर्फ अभिनेत्री रचना पारुलकरसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे सध्या एकमेकांना डेट करत आहेत. शरद आणि रचनाने मात्र अद्याप आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. रचनाने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
तिचे म्हणणे आहे, "शरद एक खूप चांगला माणुस आहे आणि आम्ही दोघे केवळ सोबत काम करतो. आम्ही दोघे एकत्र खूप वेळ घालवतो, हे सपशेल खोटे आहे. हे शक्यच नाही. शरद नायगांवमध्ये शूटिंग करतोय, तर मी फिल्मसिटीमध्ये. त्यामुळे आमच्याकडे एकमेकांसाठी वेळच नाहीये."
तर शरद म्हणतो, ब्रेकअपनंतर माझ्याविषयीच्या अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र यामुळे माझ्या आयुष्यावर काही परिणाम होत नाहीये.
याचवर्षी मार्च महिन्यात तुटले दिव्यांका-शरदचे नाते
दिव्यांका आणि शरदचे याचवर्षी मार्च महिन्यात ब्रेकअप झाले. गेल्या सात वर्षांपासून हे दोघे डेट करत होते. 'बनूं मैं तेरी दुल्हन' या मालिकेच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. बरीच वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मात्र मार्च महिन्यात दिव्यांकाने ब्रेकअप झाल्याचे उघड केले.
दिव्यांका म्हणाली होती, "एकमेकांच्या संमतीने आम्ही दोघे वेगळे झालोय. आमची आत्तापर्यंतची साथ खूप सुंदर होती. अनेक चांगल्या आठवणी आमच्यासोबत आहेत. खरं तर विभक्त होणे खूप दुःखदायक आहे. माझी विनंती आहे, की मीडियाने आम्हाला को-ऑपरेट करावे. हे याविषयीचे माझे अंतिम शब्द आहेत. याविषयी भविष्यात मी काहीही बोलू इच्छित नाही. आम्ही का विभक्त झालो, याचे कारण मी कुणालाही सांगू इच्छित नाही."
कोण आहे रचना पारुलकर?
रचना सध्या 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप' या लोकप्रिय मालिकेत महाराणी अजबगे पंवारची भूमिका विठवत आहे. 10 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबईत जन्मलेली रचना टीव्ही अभिनेत्रीसोबतच भरतनाट्यम डान्सर आहे. नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतनमधून तिने भरतनाट्यममध्ये पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय उमा डोगरा स्कूल आणि कत्थकमधून क्लासिकल कत्थकचे ट्रेनिंग घेतले आहे. मॉडेलच्या रुपातही रचनाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2009 पासून ती छोट्या पडद्यावर कार्यरत आहे.
अभिनयाची सुरुवात...
रचनाने आपल्या करिअरची सुरुवात झी टीव्हीवरी 'सात फेरे : सलोनी का सफ़र' (2005-2009) या मालिकेद्वारे केली होती. या मालिकेत तिने सलोनी सिंह (राजश्री ठाकूर)च्या मुलीची भूमिका वठवली होती. त्यानंतर 'सपनों से भरे नैना' (2011, स्टार प्लस) आणि एक मुट्ठी आसमान' (2013-14, झी टीव्ही) या मालिकांमध्ये तिने काम केले. आता ती 'भारत का वीर पुत्र : महाराणा प्रताप'मध्ये अजबदेची भूमिका वठवत आहेत. दुस-यांदा रचनाला राजश्री ठाकूरसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रचना पारुलकरची खास छायाचित्रे...