आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दीया और बाती..' ची 'संध्या बींदणी' बनली आई, दीपिकाने दिला मुलाला जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'दीया और बाती हम' मधील संध्या बींदणीच्या रोलने प्रसिद्ध झालेल्या दीपिका सिंहने शनिवारी मुलाला जन्म दिला. दीपिकाचा पती रोहित राज गोयलने आनंद व्यक्त करताना म्हटले, मी आनंद कसा व्यक्त करावा हे मला समजत नाही. आमच्या घरात नवा पाहुणा आला याचा मला आनंद आहे. दीपिका आणि मुलगा दोघांची प्रकृती चांगली आहे. 

दीपिकाने एन्जॉय केला प्रेग्नंसी पिरियड.. 
दीपिकाने प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय केला. बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे तिचे काही फोटोही, सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच तिने प्रेग्नंसीदरम्यान फोटोशूटही केले होते. एका मुलाखतीत ती म्हणाली होती. अखेरचे काही दिवस कठीण आहेत. पण रोहितने तिची काळजी घेण्यासाठी सुटी घेतली याचा तिला आनंद आहे. एकत्र कुटुंबात राहत असल्याने तिची काळजी घ्यायला अनेक जण आहेत. त्यामुळे या काळात तिने चांगली मजा केली.  

चाहत्यांची इच्छा असेल तर टिव्हीवर परतणार 
स्मॉल स्क्रीनवर पुन्हा परतण्याबाबत दीपिका म्हणाली, जर चाहत्यांची इच्छा असेल तर ती नक्की टिव्हीवर पुनरागमन करेल. पती आणि कुटुंबाचे आपल्याला सहकार्य असल्याचे ती म्हणाली. पण तसे असले तरी प्राधान्य आई बनण्याला असल्याचे दीपिकाने सांगितले होते. 
 
दीपिकाच्या आयुष्याबाबत जाणून घ्या, पुढील स्लाइड्सवर...
 
बातम्या आणखी आहेत...